-देव कॉलेजमध्ये नेत्र तपासणी
इन्फिगो आयकेअरतर्फे
देव कॉलेजमध्ये नेत्र तपासणी
रत्नागिरी, ता. ५ : येथील देव, घैसास, कीर कला वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना दिनाचे (एनएसएस) औचित्य साधून नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्र. प्राचार्या मधुरा पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि इन्फिगो आयकेअर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर झाले. या शिबिरामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण २१७ जण सहभागी झाले. या शिबिरास सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. वसुंधरा जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. ऋतुजा भोवड, इतर शिक्षक, स्वयंसेवक उपस्थित होते. सूत्रसंचालन अमिषा मडके हिने केले आर्या जाधव हिने आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

