गोगटे स्वच्छता उपक्रम
गोगटे महाविद्यालयातर्फे स्वच्छता उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने स्वच्छता ही सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात स्वच्छता सर्वेक्षण, स्वच्छता प्रभातफेरी, घरोघरी जाऊन स्वच्छताविषयक महत्वाचे सांगणे, ओला व सुका कचरा वर्गीकरण असे विविध उपक्रम राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे राबवले. समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. तुळशीदास रोकडे यांनी स्वच्छतेचे संस्कार यावर व्याख्यान दिले. डॉ. रोकडे यांनी स्वच्छतेतून आपल्या जीवन जगण्याचा स्तर उंचावता येतो. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, सामाजिक, पर्यावरणात्मक, राजकीय जीवनाची स्वच्छतेची आवश्यकता व महत्व स्पष्ट केले. मनाने स्वच्छ राहिल्याने कृती उन्नत होते. मन, बुद्धी आणि आध्यात्मिकता प्रभावी होते. मानसिक स्वच्छतेतून सामाजिक स्वच्छतेचे संस्कार घडतात, असे मत मांडले. प्रस्तावना कार्यक्रमाधिकारी प्रा. सचिन सनगरे यांनी केले. विद्यार्थांनी स्वच्छतेची शपथ घेतली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

