चिपळूण-४ महिलांचा पुणे ते आयोध्या सायकल प्रवास
rat५p६.jpg -
P२४N१६४२१
पुणे ते अयोध्यासाठी सायकलने निघालेल्या चिपळूणमधील चार महिला.
पुणे ते अयोध्या महिलांचा सायकल प्रवास
चिपळुणातील चौघींचा सहभाग ; मातृशक्तीचा संदेश
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ५ : पुणे ते अयोध्या असा प्रवास करून चिपळूणच्या चार दुर्गांनी एक वेगळा उपक्रम केला आहे. सायकल प्रवासाने रामलल्लाचे दर्शन घेऊन या महिलांनी मातृशक्तीचा संदेश दिला. या चौघांच्या कार्याचे समाजात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
चिपळूण येथील धनश्री गोखले, डॉ. अश्विनी गणपत्ये, रमा करमरकर आणि ज्योती परांजपे यांनी २१ सप्टेंबरला पुण्यातून सायकल चालवायला सुरवात केली. दररोज १२५ ते १४५ किमी अंतर पार करून महाराष्ट्रातील संगमनेर, मालेगाव, शिरपूर या शहरांना भेटी देऊन मध्यप्रदेशातील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या महेश्वर नगरीला भेट दिली. तेथे त्यांनी राजवाडा, महेश्वर मंदिर आणि नर्मदा घाटाला भेट दिली. पुढे जाऊन श्री ओंकारेश्वर व अमलेश्वर यांचे आशीर्वाद घेऊन बाजीराव पेशवे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन इंदूरला पोहोचल्या.
इंदूरमध्ये त्यांनी चिपळूणच्या माहेरवाशिण तसेच माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांची भेट घेतली. त्यानंतर उज्जैनमध्ये श्री महाकालाचे दर्शन घेऊन उत्तरप्रदेशातील झाशीच्या राणी लक्षीबाईसमोर नतमस्तक होऊन लखनौ शहराला भेट दिली. ४ ऑक्टोबरला सुरक्षितपणे अयोध्येला पोहोचल्या. या संपूर्ण प्रवासात त्यांना जयंत केळकर आणि वसंत जोशी यांची साथ लाभली. त्यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सायकल प्रवासाचा उद्देश रामलल्लाच्या दर्शनाचा आहे; पण स्वत:ला कमी न समजता तंदुरुस्त राहणे, नोकरी-व्यवसाय, घराच्या जबाबदाऱ्या सांभाळून स्वत:साठी वेळ काढणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

