सावंतवाडी येथे आज ‘खेळ फुगडीचा’ स्पर्धा
सावंतवाडी येथे आज
‘खेळ फुगडीचा’ स्पर्धा
सावंतवाडी ः शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे व शिवसेना विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून उद्या (ता. ६) सकाळी १०.३० वाजता जिल्हास्तरीय ‘खेळ फुगडीचा’ स्पर्धेचे आयोजन नगरपालिकेच्या नाथ पै सभागृहात केले आहे. यामध्ये निमंत्रित फुगडी संघांना विविध पारितोषिके व रोख स्वरुपात बक्षिसे ठेवली आहेत. यामध्ये प्रथम पारितोषिक १११११, द्वितीय ७७७७, तृतीय ५५५५ रुपये तसेच वैयक्तिक पारितोषिके आहेत. यामध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने सावंतवाडी तालुक्यातील ज्येष्ठ महिला शिवसैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. शिवसेना सावंतवाडी तालुक्यातर्फे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व तालुक्यातील महिला भगिनी, प्रेक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सावंतवाडी तालुका संघटक मायकल डिसोजा यांनी केले आहे.
.............
मळगावात आज
नेत्र चिकित्सा
सावंतवाडी ः भाजप मळगाव व शुभांगी ऑप्टिक्स सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मळगाव येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे. मळगाव ग्रामपंचायतीलगत असलेल्या पेडणेकर सभागृहात उद्या (ता. ६) सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत हे आरोग्य शिबिर होणार आहे. या शिबिरात डोळ्यांच्या सर्व तपासण्या तसेच मोतिबिंदू तपासणी मोफत करण्यात येणार आहे. तसेच माफक व अत्यल्प दरात चष्मे उपलब्ध करण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मळगाव सरपंच हनुमंत पेडणेकर, माजी सभापती राजू परब यांनी केले आहे.
...............
आचऱा येथे १३ ला
‘शक्तितुरा’ कार्यक्रम
आचरा ः इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान कसबा आचरे चौघडयावरचा गणपती आचऱ्याचा विघ्नहर्ता गणेशोत्सवानिमित्त डोंगरेवाडी १ आणि २ ग्रामस्थांच्यावतीने १३ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता डोंगरेवाडी बाल नृत्यांगनांचे समई नृत्य तर रात्री ९.३० वाजता श्रीकृष्ण कलामंच किन्हळ दापोली यांचा सांस्कृतिक वारसा जपणारा कोकणचा कार्यक्रम ‘शक्तितुरा’ होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.
.............
आंबेरीत शुक्रवारी
दशावतारी नाटक
मालवण ः आंबेरी-वरचीवाडी येथील प्ले बॉईज कला-क्रीडा मित्रमंडळातर्फे नवरात्रोत्सव कार्यक्रम आयोजित केले आहेत. यात रोज सकाळी विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री गरबा, दांडिया व रोज मनोरंजनात्मक खेळ होणार आहेत. यामध्ये शुक्रवारी (ता.११) होम, महापूजा, महाप्रसाद व रात्री १० वाजता पार्सेकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग, १२ ला देवीच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे.
--------------
वेतोरे सातेरी मंदिरात
शुक्रवारी दिंडी उत्सव
वेंगुर्ले ः वेतोरे ग्रामदेवता श्री देवी सातेरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त १२ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त शुक्रवारी (ता. ११) रात्री ८ वाजल्यापासून दिंडी उत्सव होणार आहे. यावेळी गावातील वाड्यांमधील आकर्षक दिंड्या, हरिनामाच्या जयघोषात सातेरी मंदिर परिसरात दाखल होणार आहेत. रात्री १२ वाजता मंदिरात हरिनाम सप्ताहाला सुरुवात होणार आहे. शनिवारी काल्याने सप्ताहाची सांगता होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

