सायबर क्राईममधील ५८ लाख गोठवले
‘सायबर क्राईम’मधील ५८ लाख गोठवले
सिंधुदुर्ग पोलिसांची कामगिरी; तक्रारदारांना २१ लाख परत
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ५ ः सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायबर पोलिस ठाणे अंतर्गत १ जानेवारी ते ३० सप्टेंबर या आठ महिन्यांत दाखल गुन्ह्यांमध्ये तक्रारदारांच्या झालेल्या आर्थिक फसवणुकीपैकी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलद्वारे ५८ लाख ९ हजार ६१० रुपये एवढी रक्कम विविध बँकखात्यांमध्ये गोठविली आहे. पैकी तक्रारदारांना २१ लाख २७ हजार ५१६ रुपये एवढी रक्कम परत मिळवून दिली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दिली.
सिंधुदुर्ग सायबर पोलिस ठाण्यातर्फे ऑनलाईन आर्थिक फसवणूक, सोशल मीडिया फ्रॉड, मोबाईल चोरी, मोबाईल हरवणे, सायबर जागृकता या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बसस्थानके, रेल्वेस्थानके, बाजारपेठा, पोलिस ठाणे आदी महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी ८४ बॅनर्स लावून तसेच लघु चित्रपटाद्वारे सायबर क्राईमबाबत जनजागृती केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शाळा, कॉलेजमध्ये सायबर क्राईम जनजागृती अभियान राबवून सुमारे ५० हजारपेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकांना सायबर व सोशल मीडियाचा वापर करून घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत कशाप्रकारे सावधानता बाळगावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. त्या अनुषंगाने दाखल तक्रारीतील २१ लाख २७ हजार ५१६ रुपये एवढी रक्कम परत मिळवून देण्यात यश आले आहे, तर ५८ लाख ९ हजार ६१० रुपये विविध बँक खात्यांमध्ये गोठविली आहे, असे पोलिस अधीक्षक अग्रवाल यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
............
पोलिसांचे आवाहन
नागरिकांनी सोशल मीडियावरील आमिषांना, धमक्यांना तसेच खोट्या लिंकस, फसवे अॅप, अनोळखी कॉल्स, व्हिडीओ कॉल्सवरून होणाऱ्या फसवणुकीस बळी पडू नये. अशा प्रकारे फसवणूक झाल्यास तत्काळ टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून झालेल्या फसवणुकीबाबत माहिती द्यावी. नागरिकांनी बँक खाते, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआयबाबत अनोळखी व्यक्तीस फोनद्वारे अथवा सोशल साईटवर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती देऊ नये, असे आवाहन सिंधुदुर्ग पोलिस दलातर्फे सर्व नागरिकांना केले आहे.
.............
हरवलेल्या २१७ मोबाईलचा शोध
सिंधुदुर्ग जिल्ह्यात हरवलेल्या मोबाईल तक्रारींपैंकी २१७ मोबाईलचा शोध घेतला असून, हे मोबाईल मूळ मालकांच्या ताब्यात परत दिले आहेत, अशीही माहिती देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

