शिवसेना ठाकरे गटाचे
‘बांधकाम’ विरोधात 
गुरुवारी आंदोलन

शिवसेना ठाकरे गटाचे ‘बांधकाम’ विरोधात गुरुवारी आंदोलन

Published on

शिवसेना ठाकरे गटाचे
‘बांधकाम’ विरोधात
गुरुवारी आंदोलन

वैभववाडी, ता. ५ ः निकृष्ट पद्धतीने केलेल्या कामांमुळे वर्ष-दीड वर्षापूर्वी केलेले रस्ते, तसेच घाटरस्त्यांतील संरक्षक भिंती वाहून गेल्या आहेत. या कामांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी, या मागणीसाठी सार्वजनिक बांधकामविरोधात ठाकरे शिवसेना १० ऑक्टोबरला आंदोलन छेडणार आहे.
याबाबत ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मंगेश लोके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्याशी पत्रव्यवहार केला. सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता आणि वैभववाडीच्या उपअभियंत्यांच्या देखरेखीखाली वैभववाडी तालुक्यात अनेक कामे झाली. भुईबावडा घाटात दीड-दोन वर्षापूर्वी चार कोटी रुपये खर्चून काम केले. यातील उर्वरित रकमेतून याच वर्षी भुईबावडा घाटात सरंक्षक भिंत बांधण्यात आली होती. या भिंतीचे काम निकृष्ट झाल्यामुळे ती वाहून गेली. तेथील बाजूपट्टीचे कामही वाहून गेले आहे. वैभववाडी-उंबर्डे रस्त्याचे काम २०२३-२४ मध्ये ४ कोटी रुपये खर्चून केले. निकृष्ट कामामुळे या रस्त्याची दुरवस्था झाली असून, तो वाहतुकीस अयोग्य बनला आहे. भर पावसात या रस्त्याचे हॉटमिक्सचे काम करण्यात आले. खारेपाटण-गगनबावडा रस्त्याची देखील तीच अवस्था झाली आहे. गेल्यावर्षी केलेल्या रस्त्याला आता शेकडो खड्डे पडले आहेत. बाजूपट्टी शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. बांधकाम विभागाने केलेल्या निकृष्ट कामांमुळे आतापर्यंत अनेक अपघात या मार्गावर झाले आहेत. या कामांची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती; परंतु त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न केल्यामुळे १० ऑक्टोबरला बांधकामविरोधात येथील तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com