वीजखांबावरील फॉल्ट काढताना ताराही ओढते
नवदुर्गा (लोगो)
rat५p२५.jpg
२४N१६५५४
साखरपा : रूपाली बाचिम.
महावितरणमध्ये तिने स्वतःचे निर्माण केले स्थान
करजुवे गावच्या रूपाली बाचिम; खांबावरील बिघाड दुरुस्त करण्याचे धाडसी काम
अमित पंडित : सकाळ वृत्तसेवा
साखरपा, ता. ५ : नोकरीची काही क्षेत्रे परंपरागतपणे पुरुषप्रधान समजली जातात. अशांपैकी एक क्षेत्र म्हणजे महावितरण; पण या क्षेत्रात पुरुषांची मक्तेदारी मोडत स्वत:चे स्थान निर्माण करणारी आधुनिक नवदुर्गा म्हणजे करजुवे गावाची रूपाली बाचिम.
२०२१ पासून रूपाली आरवली महावितरणअंतर्गत येणाऱ्या धामापूरतर्फे संगमेश्वर गावात कार्यरत आहेत. महावितरणची बिले वसूल करणे, मीटर बसवणे, फ्यूज बदलणे अशी कामे त्या करतातच; पण खांबावर चढून बिघाड शोधून काढणे, महावितरणच्या तारा ओढणे, एकमेकांना चिकटलेल्या तारा सोडवणे ही कामेही त्या लीलया करतात. या कामात त्यांना अधिकारी अमोल म्हस्के आणि लाईनमन संदेश पारधी यांचे सातत्याने मार्गदर्शन असल्याचे त्या सांगतात.
करजुवे गाव हे दुर्गम गाव म्हणून समजले जाते. या गावात दोन बहिणी आणि एक भावासह शिकून लहानाची मोठ्या झालेल्या रूपाली यांनी महिलांना अपरिचित असलेले आयटीआय हे क्षेत्र पुढील शिक्षणासाठी निवडले. शेती हा पारंपरिक उद्योग असलेले बाचिम कुटुंबीयात रूपाली यांच्या डोक्यावरील वडिलांचे छत्र हरवल्यावर आईने शेती सांभाळत चार अपत्यांना वाढवले. त्यांच्यापैकी तिसऱ्या रूपाली. आर्थिक परिस्थिती बेताची असताना बारावीनंतर काय, या प्रश्नाला चुलते मंगेश कांगणे आणि अन्य एका नातेवाइकांनी आयटीआय करण्याचा सल्ला दिला आणि त्यासाठी इलेक्ट्रिशियन हा मार्ग दाखवला. प्रत्यक्षात ही वाट रूपाली यांच्यासाठी वाटते तितकी सोपी नव्हती. संगमेश्वर येथील आयटीआयमध्ये प्रवेश घेतल्यावर लक्षात आले की, इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला अवघ्या चार मुली आहेत; पण त्याही परिस्थितीत करजुवे ते संगमेश्वर असा प्रवास दोन वर्षे करत त्यांनी तो कोर्स ७१ टक्के गुण मिळवत पूर्ण केला.
कोर्स पूर्ण झाल्यावर आरवली येथे वर्षभर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम केले आणि अनुभव मिळवला. त्यानंतर शहरात जाण्याचा विचार सुरू असतानाच महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठीची जाहिरात रूपाली यांना समजली आणि त्यांनी ऑनलाइन अर्ज केला. त्यानुसार आरवली कार्यालयातच त्यांची विद्युत सहाय्यक या पदावर नियुक्ती करण्यात आली.
----
कोट
या क्षेत्राची आधी आवड नव्हती; पण परिस्थितीमुळे हे क्षेत्र स्वीकारल्यावर आवड निर्माण झाली. वरिष्ठांच्या आणि साथीदारांच्या प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास वाढला.
- रूपाली बाचिम, विद्युत सहाय्यक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

