राजापूर - पिंजऱ्यात न शिरता बिबट्या त्यावर चढला
rat५p३१.jpg
16594
राजापूर : नाटेत विहिरीत पडलेला बिबट्या
rat५p३२.jpg
16602
राजापूर ः पिंजऱ्यात सापडलेल्या बिबट्याला नेताना वनविभागाचे कर्मचारी
बिबट्या चढला पिंजऱ्यावरच...
वनविभागाच्या नाकी दम; नाटेत विहिरीतून सुटका
राजापूर, ता. ५ : गेल्या काही दिवसांपासून नाटे परिसरामध्ये दिवसाढवळ्या फिरून दहशत निर्माण केलेला बिबट्या बांदकरवाडी येथे विहिरीमध्ये पडला. विहिरीतून बिबट्याने उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला; मात्र तो अयशस्वी ठरला. त्याला पकडण्यासाठी सोडलेल्या पिंजऱ्यावरच चढून घाबरगुंडी उडवली. अखेर अथक प्रयत्नांनी वनविभागाला स्थानिक ग्रामस्थांच्या साहाय्याने पिंजऱ्याद्वारे बिबट्याला विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासामध्ये सोडल्याची माहिती वनविभागाने दिली.
नाटे बांदकरवाडी येथे थळेश्री यांच्या मालकीचे विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती सरपंच संदीप बांधकर यांनी वनविभागाला दिली. दरम्यान, लोकांनीही बिबट्याला पाहण्यासाठी एकच गर्दी केली. वनविभागाने तत्काळ बिबट्याला पिंजऱ्याच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. विहिरीची उंची सुमारे १२-१५ फूट असल्याने पिंजऱ्यामध्ये न घुसता बिबट्याने दोनवेळा पिंजऱ्यावर चढून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला; मात्र विहिरीच्या काठड्याला जाळी लावली असल्याने तो बाहेर येऊ शकला नाही. त्यानंतरही वनविभागाचे प्रयत्न सुरू होते. अखेर, या ग्रामस्थांच्या साथीने बिबट्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात यश आले. विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहायक वनसंरक्षक प्रियांका लगड, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे वनपाल जयराम बावदाणे, सारीक फकीर, वनरक्षक विक्रम कुंभार, श्रावणी पवर, रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, म्हादये, दीपक म्हादये, गुरव, संतोष चव्हाण, नीलेश म्हादये यांनी कामगिरी केली. बिबट्या मादी असून, सुमारे अडीच ते तीन वर्षांची असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

