‘सिद्धिविनायक’ न्यास सदस्यपदी कांबळी
16625
‘सिद्धिविनायक’ न्यास
सदस्यपदी कांबळी
मसुरे ः प्रभादेवी मुंबई येथील श्री सिद्धिनायक गणपती मंदिर न्यासाच्या व्यवस्थापन समिती सदस्यपदी रेवंडी (ता. मालवण) गावच्या आणि शिवसेना पक्षाच्या महिला नेत्या मीना कांबळी यांची निवड करण्यात आली. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे खास अभिनंदन केले आहे. मीना कांबळी या मुंबई येथे शिवसेनेच्या महिला नेत्या म्हणून काम करत असून, गेली अनेक वर्षे सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी साई संस्थान शिर्डी या संस्थेच्या ट्रस्टी म्हणून काम केले आहे. अनेक संस्थांवर त्या कार्यरत असून, रेवंडी गावातही त्यांचे सामाजिक, राजकीय, कला क्षेत्रामध्ये मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीबद्दल रेवंडी गावातून तसेच मुंबई येथून अभिनंदन होत आहे. सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाच्या सदस्यपदी झालेली निवड ही माझ्या कार्याचा गौरव असून, या संधीचा उपयोग जनतेच्या सेवेसाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

