सर्वसामान्यांना लाभ दिल्याने आनंद देणारा कार्यक्रम
rat५p३३.jpg-
P२४N१६६२०
दापोली- शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार. सोबत अन्य मान्यवर
------------
प्रत्येक नागरिकापर्यंत न्याय पोहचला पाहीजे
न्यायमूर्ती माधव जामदार ः १७ हजार लाभार्थींना योजनांचा लाभ
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. ५ : सर्वसामान्य नागरिकांना लाभ दिल्याने समाधान आणि आनंद देणारा आजचा कार्यक्रम आहे. हा जिल्हा विचारवंतांचा, बुध्दिवंतांचा, त्याग करणाऱ्यांचा आहे. प्रत्येक नागरिकांपर्यंत न्याय पोहचला पाहिजे, ही न्यायाची व्यापक संकल्पना आहे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केले.
दापोली येथील विधी सेवा महाशिबीर शासकीय सेवा योजनांच्या महामेळाव्याचे उद्घाटन न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या हस्ते आज झाले. यावेळी १७ हजार ५०१ लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ दिल्याची पुस्तिका जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी न्यायमूर्ती जामदार यांना सुपूर्द केली.
न्यायमूर्ती श्री. जामदार यांनी विविध विभागांनी उभारलेल्या स्टॉलची पहाणी करुन माहिती घेतली. यानंतर ते म्हणाले, न्याय व्यवस्था आणि प्रशासन यांनी प्रगती केलेल्या जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती हे पद मिळाले. राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत, ते सर्वच नागरिकांना मिळाले पाहिजेत. सर्वसामान्य जनतेपर्यंत समाजातल्या तळागाळापर्यंत नागरिकाला लाभ पोहचवायचा असेल तर, कल्याणकारी योजना आखणं आणि त्याची अंमलबजावणी करणं हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. अशा योजना लोकांपर्यंत पोहचल्या पाहिजेत, त्याचा लाभ मिळाला पाहिजे. यासाठीच विधी सेवा महाशिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश गोसावी म्हणाले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने पुढाकार घेऊन शहरात दीडशे तर, जिल्ह्यात तीनशे पन्नास कार्यक्रम घेतले. नागरिकांची जनजागृती करणे, नागरिकांना विविध विषयातील हक्क, गुन्ह्यांबाबत शिक्षेची माहिती देणे, न्यायालयात दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या कमी करणे हा हेतू या कार्यक्रमामागील होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

