कामगार कल्याण गटस्तरीय स्पर्धेचे पारितोषिक वितरण
कामगार कल्याण गटस्तरीय
स्पर्धेचे पारितोषिक वितरण
चिपळूण, ता. ९ः कामगार कल्याण गटस्तरीय पुरुष भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात झाले. या स्पर्धेत कामगार कल्याण महाड संघाने सांघिक विजेतेपद पटकावले तर कणकवली संघ द्वितीय आणि कामगार कल्याण चिपळूण संघाने तृतीय क्रमांक मिळवला. या विजेत्यांसह वैयक्तीक पारितोषिकेही देण्यात आली.
या वेळी जे. के. फाईल्सचे एचआर व्यवस्थापक राजेश शिंदे, सुप्रिया लाईफ सायन्सचे एचआर मॅनेजर मनोज भामरे, नेरोलॅक कंपनीचे नंदन सुर्वे, साफइस्टचे मॅनेजर संतोष कदम, संजय सुर्वे उपस्थित होते. उत्कृष्ट पखवाज- स्वराज चौधरी (महाड), सोहम राणे (कणकवली), रोहित डेरवणकर. उत्कृष्ट गायक- शंकर सावंत (मालवण), अनिकेत चव्हाण (पोफळी), सुजित परब (कणकवली). उत्कृष्ट हार्मोनियम-रमेश प्रभुळकर (पोफळी), प्रथमेश शेटकर (चिपळूण), सुजित परब (कणकवली). सर्वोत्कृष्ट तालसंच- पिंगुळी संघ, महाड आणि चिपळूण संघ. प्रास्ताविक कामगार कल्याण अधिकारी अरूण लाड यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

