विकासासाठी केसरकर यांना साथ द्या

विकासासाठी केसरकर यांना साथ द्या
Published on

17578

विकासासाठी केसरकर यांना साथ द्या

नितीन मांजरेकर ः पालमध्ये शिंदे गटातर्फे विकासकामे

वेंगुर्ले, ता. ८ ः पाल (ता.वेंगुर्ले) येथे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मंजूर विकासकामांची भूमिपूजने शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी मांजरेकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत आगामी काळात अशाच प्रकारे गावात विकासकामे आणायची असल्यास कोणत्याही आर्थिक आमिषांना बळी न पडता हक्काचे व्यक्तिमत्व दीपक केसरकर यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
पाल-गोडावणेवाडी झेंडोबा मंदिर रस्ता काँक्रिटीकरण कामाचे पंचायत समिती माजी सभापती तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुनील मोरजकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर पाल न्हैचिआड रस्ता ते अंबाई कॅश्यू फॅक्टरीकडे जाणारा रस्ता सिमेंटीकरण कामाचे पाल सरपंच कावेरी गावडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. उद्योजक अंकुश गावडे, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, उपसरपंच प्रीती गावडे, पंच सदस्य प्रदीप मुळीक, शाखाप्रमुख भरत गावडे, तंटामुक्ती अध्यक्ष दीपक गावडे, संजय गावडे, ओंकार गावडे, महादेव गावडे, प्रभाकर गावडे, श्रीनाथ तेली, सोनू गावडे, बापू गावडे, दत्ताराम गावडे, राजाराम गावडे, सुधीर गावड, उल्हास गावडे, सुभाष गावडे, लाडू गावडे, सुचिता नाईक, चंद्रकांत गावडे, दत्ताराम गावडे, महेश आंगचेकर आदी उपस्थित होते.
यावेळी येथील ग्रामस्थांच्या मागणीनुसार पुढील काळात झेंडोबा मंदिर हे पर्यटनाच्या दृष्टीने एक उत्तम धार्मिक स्थळ असल्याने मंदिर परिसर सुशोभिकरणासाठी सिंधूरत्न योजनेच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मांजरेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com