स्त्री परिचरांच्या मानधनात वाढ करा

स्त्री परिचरांच्या मानधनात वाढ करा

Published on

स्त्री परिचरांच्या मानधनात
वाढ करा ः रावजी यादव

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. ८ ः शासनाने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस, कोतवाल, सरपंच, पोलिसपाटील या सर्वांच्या मानधनात वाढ केली आहे. मात्र, शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणाऱ्या जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचरांना नाराज केले आहे. त्यांच्याही मानधनात भरीव वाढ करावी, अशी मागणी दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी शासनाकडे केली आहे.
श्री. यादव यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘‘जिल्हा परिषद आरोग्य उपकेंद्रातील कार्यरत अंशकालीन स्त्री परिचरांच्या विविध मागण्यांबाबत मंत्रालय स्तरावर अनेकदा प्रयत्न केला. जिल्ह्यात सुमारे २५० तर राज्यात १० हजार ६०० अंशकालीन स्त्री परिचर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना न्याय देण्याबाबत शासकीय बैठकांमध्ये याबाबत आश्वासने दिली. मात्र, त्याची अद्याप पूर्तता झाली नाही. शासनाने नव्याने स्थापन केलेल्या आरोग्य संस्थांमध्ये अवकुशल कंत्राटी मनुष्यबळाच्या मानधनांमध्ये भरघोस वाढ केली आहे. सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका मदतनीस, कोतवाल, तसेच पेन्शनदाराच्या उपदानामध्ये भरघोस वाढ केली आहे. पण, १९८० पासून दिवसाला ३० रुपयांपासून कार्यरत असलेल्या व सध्या शंभर रुपये रोज मानधन घेणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना मात्र मानधन वाढीचा लाभ दिला नाही. कोरोनाच्या काळातही डोंगर कपारीतून पायपीट करून कोरोनावर मात करण्यास मदत करणाऱ्या या आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये मानधन मिळावे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याप्रमाणे नोकरीत १० टक्के आरक्षण लागू व्हावे. कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व प्रकारच्या रजा, गणवेश भत्ता, विमा संरक्षण, पेन्शन, किरकोळ रजा मंजूर व्हावी. तसा शासन निर्णय होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत घ्यावा.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com