शासकीय महाविद्यालयाच्या
अधिष्ठातांविरोधात निर्दशने

शासकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांविरोधात निर्दशने

Published on

17621

शासकीय महाविद्यालयाच्या
अधिष्ठातांविरोधात निदर्शने

सिंधुदुर्गनगरी, ता.९ ः जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांवर मनमानीचा आरोप करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी निदर्शने केली. कारभारात सुधारणा न झाल्यास ११ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला.
यावेळी आंदोलकांनी अधिष्ठातांवर आरोप केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता हे महाविद्यालयातील प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचे काम करत आहेत. वरिष्ठ सहाय्यक नीलेश जोगळेकर व महेश काळे यांना बदली करण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला. याबाबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, आयुक्त तसेच मुख्यमंत्र्यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या कामकाजात सुधारणा झाली नसल्याचा आरोप करत आज पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटनेने राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली दुपारी १ वाजता अधिष्ठाता यांच्या दालनाबाहेर निदर्शने केली. अधिष्ठाता यांच्या कारभारात सुधारणा न झाल्यास ११ ऑक्टोबरपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. यावेळी राज्य सरकारी कर्मचारी संघटना अध्यक्ष एस. एल. सपकाळ, कार्याध्यक्ष सत्यवान माळवे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कर्मचारी संघटना अध्यक्ष शंकर जाधव, महाराष्ट्र शासकीय नर्सेस असोसिएशन जिल्हाध्यक्ष पी. डी. तांडेल, निलेश जोगळेकर, प्रवीण वेंगुर्लेकर आदी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com