भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांची वाचनालयात क्षेत्रभेट

भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांची वाचनालयात क्षेत्रभेट

Published on

N17702

भाषा विषयाच्या विद्यार्थ्यांची वाचनालयात क्षेत्रभेट
वाचनसंस्कृती वाढीला चालना; स्पर्धा परीक्षा पुस्तकांची पाहणी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयास शैक्षणिक क्षेत्रभेट दिली. रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे आधुनिक जगाप्रमाणे अपडेट असल्यामुळे आणि तेथील सर्व सुविधा पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केला.
वाङ्मय मंडळांतर्गत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा विभागाच्या शैक्षणिक अभ्यासाचा एक भाग म्हणून क्षेत्रभेटीचे आयोजन केले. या वेळी विद्यार्थ्यांनी वाचनालयामधील कार्यपद्धती, पुस्तकांच्या वर्गीकरणाची प्रक्रिया आणि वाचनालयाचा सर्वांगीण उपयोग, वाचनाचे महत्व आणि संशोधन प्रक्रियेतील वाचनालयाचे योगदान जाणून घेतले. क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या विविध विभागांबद्दल माहिती देण्यात आली. ग्रंथपाल मीनल हळदणकर व मानसी मराठे, इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना ग्रंथसंपदा, ऐतिहासिक, वैज्ञानिक आणि शैक्षणिक साहित्य, ई-बुक्स आणि डिजिटल संसाधनाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ग्रंथालयातील वर्गीकरण पद्धती जुन्या आणि दुर्मिळ पुस्तकांचे संवर्धन आणि संशोधनासाठी व स्पर्धा परीक्षांसाठी उपलब्ध पुस्तकांचा असलेल्या सुविधांची पाहणी केली. वाचनालयातील डिजिटल ई-पुस्तक प्लॅटफॉर्मच्या कार्यप्रणालीचा अनुभव घेतला.
या क्षेत्रभेटीस प्र. प्राचार्या मधुरा पाटील, प्रा. वसुंधरा जाधव, प्रा. गौरी बोटके आणि प्रा. वीणा कोकजे उपस्थित होत्या. यामध्ये मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे कलाशाखेचे सर्व विद्यार्थी, प्रथम वर्ष विज्ञान शाखेचे इंग्रजी विषयांचे विद्यार्थी सहभागी झाले. भेटीसाठी वाचनालयाचे कार्यवाह आनंद पाटणकर, ग्रंथपाल यांचे सहकार्य लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com