संगमेश्वर - कासे-गोताडवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवले

संगमेश्वर - कासे-गोताडवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवले

Published on

17706

कासे-गोताडवाडी रस्त्याची डागडुजी

संगमेश्वर, ता. ९ ः तालुक्यातील कासे-गोताडवाडी रस्त्याला भलेमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत होती. अनेक वर्षे पाठपुरावा करूनही या रस्त्याची डागडुजी झालेली नव्हती. या समस्येची दखल घेऊन कडवई विभागातील शिवसैनिक सुभाष चव्हाण आणि जितेंद्र चव्हाण यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला.
जाधव यांनी तत्काळ ही समस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांच्याकडे मांडली. त्यांनी या रस्त्याचे काम प्राधान्याने करण्याची विनंती केली होती. या रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची ग्रामस्थांची समस्या दूर झाली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शिरंबे, पुऱ्ये आणि आसपासच्या गावांमधून जाणारी एसटी बस पुन्हा सुरू होईल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com