‘स्पॉट फोटोग्राफी’त वरुण प्रथम
17794
‘स्पॉट फोटोग्राफी’त वरुण प्रथम
नांदगाव ः डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सव ‘मयुरपंख-२०२४’ मध्ये सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, तोंडवलीच्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी वरुण पाटील याने ‘स्पॉट फोटोग्राफी’ प्रकारात प्रथम पारितोषिक पटकावले. त्याची अकोला येथे होणाऱ्या महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या ‘इंद्रधनुष्य’ या विद्यापीठीय महोत्सवात निवड झाली. शरद पवार कृषी महाविद्यालय खरवते-दहिवली (ता. चिपळूण) येथे आयोजित युवा महोत्सवात तोंडवली कृषी महाविद्यालयातून १२ विद्यार्थ्यांनी नृत्य, वादविवाद, प्रश्नमंजूषा व स्पॉट फोटोग्राफी स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला. यातील स्पॉट फोटोग्राफी स्पर्धा प्रकारात वरुणने आपल्या कलेने सर्वांना प्रभावित करून प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल सिंधुदुर्ग एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष वसंत सावंत, सचिव निखिल सावंत, प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण यांनी वरुण पाटील व सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सोनाली पावसकर, प्रा. मिलिंद कोरगावकर, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. प्रफुल्ल गव्हारे, प्रा. समीर धोडरे, संघ व्यवस्थापक राकेश वाळवे, संदेश कार्ले यांचे या स्पर्धेसाठी मार्गदर्शन मिळाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

