कला प्राप्तीसाठी हवी अविरत साधना
17792
मळगाव ः मळगाव हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रसाद देवधर यांचे स्वागत करताना मुख्याध्यापक मारुती फाले.
कला प्राप्तीसाठी हवी अविरत साधना
डॉ. प्रसाद देवधर ः मळगाव हायस्कूलमध्ये अकादमी
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता.९ ः अथक प्रयत्नाशिवाय कोणतीही कला साध्य होऊ शकत नाही. प्रत्येक कलेसाठी साधना करावीच लागते, असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर यांनी मळगाव येथे केले.
मळगाव ऐक्यवर्धक संघ मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेमध्ये साधना कला अकादमी सुरू करण्यात आली. या अकादमीचे उद्घाटन डॉ. देवधर यांनी केले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी संगीत अलंकार ईश्वरी तेजम (गायन), तबला, पखवाज व ढोलकी वादक संकेत म्हापणकर, शास्त्रीय नृत्यांगना पूजा सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मनोहर राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, पर्यवेक्षक सुनील कदम, संस्था संचालक रामचंद्र केळुसकर, माजी मुख्याध्यापक बाळकृष्ण मुळीक, वैजनाथ देवण, प्रकाश केसरकर, दीपक जोशी आदी उपस्थित होते.
डॉ. देवधर म्हणाले, ‘‘खेडेगावातील मुलांना या अकादमीचा फायदा होईल. मुलांनी कोणतीतरी एक कला अवगत करावी. यासाठी प्रशालेमध्ये शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, शास्त्रीय नृत्य, तबला, पखवाज, हार्मोनियमचे वर्ग सुरू केले आहेत. पुढील पाच वर्षांत मळगावमध्ये घराघरांत तबला वादक, हार्मोनियम वादक, गायक घडलेले दिसतील. मळगाव प्रशालेने अनेक कलाकार घडविले, याबद्दल या शाळेचे कौतुक वाटते.’’ यावेळी त्यांनी मळगाव प्रशालेला हार्मोनियम, तबला, ढोलकी, चायना ब्लॉक, मंजिरी या वस्तू भेट दिल्या. प्रकाश केसरकर यांनी सूत्रसंचालन केले. मुख्याध्यापक मारुती फाले यांनी प्रास्ताविक केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

