''प्राधिकरण''मधील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
१७८१०
‘प्राधिकरण’मधील समस्या सोडवू
अनिल पाटील ः सिंधुदुर्गनगरीत ‘नवनगर’तर्फे सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः ‘‘सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणमधील नवनगर रहिवासी संघ शैक्षणिकदृष्ट्या मुलांना आणि उद्योजिकांना देत असलेले प्रोत्साहन कौतुकास्पद आहे. असे कार्य कायम सुरू ठेवावे. प्रशासनाचे त्याला सहकार्य राहील. येथील समस्याही सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू,’’ असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी नवनगर रहिवासी संघामार्फत आयोजित कार्यक्रमात केले.
नवरात्रोत्सवानिमित्त नवनगर रहिवासी संघामार्फत नवनगरमधील उद्योजिका आणि शिक्षण, कला, क्रीडा क्षेत्रात प्रावीण्यप्राप्त मुलांचा सत्कार कार्यक्रम जिल्हाधिकारी पाटील यांच्या हस्ते आयोजित केला होता. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव संपूर्णा कारंडे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी पंचायत समिती सदस्या सुप्रिया वालावलकर, पुष्पसेन सावंत ज्ञानपीठ संस्थेचे विश्वस्त भूपतसेन सावंत, नवनगर रहिवासी संघाचे अध्यक्ष आदेश नाईक, खजिनदार दीपक जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ. नाईक, माजी अध्यक्ष अशोक रासम, चंद्रकांत पाटकर आदींसह नवनगरमधील रहिवासी उपस्थित होते.
भाजप जिल्हाध्यक्ष सावंत म्हणाले, ‘‘सिंधुदुर्गनगरीमधील रस्तेदुरुस्तीचा मोठा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी प्राधिकरणाकडील सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करून घेण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे. लवकरच निधी उपलब्ध करून सर्व रस्त्यांची कामे केली जातील. विरंगुळा केंद्रासाठी ‘नियोजन’मधून २० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर विरंगुळा केंद्राचेही काम होईल. नगरपंचायत होण्यासाठी सर्वांचेच प्रयत्न सुरू आहेत. एक-दीड वर्षात नगरपंचायत सुद्धा होईल. त्याशिवाय येथील गटार बांधणे, भूखंड वर्ग १ होण्यासाठी प्रयत्न करणे व अन्य प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील व एक सुंदर शहर निर्माण करू.’’
न्यायाधीश संपूर्णा कारंडे यांनी महिला अत्याचाराच्या बाबतीत सजग राहण्याचे आवाहन केले. सुप्रिया वालावलकर यांनी नवनगरमधील रहिवाशांच्या कायम पाठीशी राहून त्याचे प्रश्न सोडवू, असे सांगितले. नवनगरमधील काही महिला वेगवेगळे व्यवसाय सुरू करून उद्योजिका बनल्या आहेत. स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. काही मुले परदेशात शिक्षणात भरारी घेतली आहे, तर काही मुले क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर पोचली आहेत, अशांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. अशोक रासम यांनी प्रास्ताविक केले. उल्हास पालव, संदीप गावडे, शुभम तवटे, परेश परब, बंड्या नाईक यांनी स्वागत केले. नागेश नेमळेकर यांनी सूत्रसंचालन केले. आदेश नाईक यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

