सुप्रिया केरकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

सुप्रिया केरकर ठरल्या पैठणीच्या मानकरी

Published on

सुप्रिया केरकर ठरल्या पैठणीच्या मानकरी
वेंगुर्ले, ता. ९ ः वेंगुर्ले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीचा स्पर्धेत वेंगुर्ले वडखोल येथील सुप्रिया केरकर विजेत्या ठरल्या. उपविजेत्या शहरातील राऊळवाडा येथील मेघना राऊळ यांचा नथ देऊन व तृतीय क्रमांक प्राप्त अक्षरा गोखरणकर यांचा टेबल फॅन देऊन सन्मान करण्यात आला. या स्पर्धेत ४५ महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगराध्यक्ष संदेश निकम, शहरप्रमुख अजित राऊळ, माजी नगरसेविका सुमन निकम, साक्षी चमणकर, कोमल सरमळकर, राजश्री मरये, सुरेश भोसले, विवेक आरोलकर, सुजित चमणकर, हेमंत मलबारी, सचिन मांजरेकर, सुहास मेस्त्री, डेलीन डिसोजा आदींच्या उपस्थितीत केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com