रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची सत्वपरीक्षा

रत्नागिरी- रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची सत्वपरीक्षा

Published on

rat9p19.jpg-
17806
रत्नागिरी : स्वयंवर मंगल कार्यालयात आयोजित भाजप बूथ कमिटीच्या मेळाव्यात बोलताना माजी आमदार बाळ माने. सोबत पदाधिकारी.
-------------
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची सत्वपरीक्षा
बाळ माने ; कमळ चिन्हावरच लढायचा निर्धार
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : तीन निवडणुकांत झालेला पराभव आणि २०१९ मध्ये घडलेल्या घटना आपण विसरलो नाहीये, ही सत्वपरीक्षा आहे. रत्नागिरीकरांनी कोणाला हरवायचं आहे हे ठरवलेलं आहे. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात भाजपला एकही जागा लढवण्यासाठी मिळाली नाही; मात्र आता कमळाच्या निशाणीवर निवडणूक लढवायची आहे, अशी सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे, असे प्रतिपादन भाजपा विधानसभा क्षेत्रप्रमुख, माजी आमदार बाळ माने यांनी केले.
स्वयंवर मंगल कार्यालयात रत्नागिरी-संगमेश्वर विधानसभेतील भाजपच्या ३५० बूथप्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. बूथ कमिट्या पूर्ण करून कार्यकर्त्यांनी घरोघरी संपर्क साधावा. वरिष्ठ नेते निर्णय घेतील; परंतु आपण सज्ज राहिले पाहिजे. आपण २०१९ प्रमाणेच वागायचं आहे की काय करायचं आहे, हे आपल्या कार्यकर्त्यांना विचारा. ३५२ बूथमधील प्रमुखांनी किमान २० घरांमध्ये भेटा व तीन दिवसांत निर्णय सांगा. बैठकीला पदाधिकारी किसन घाणेकर, भाऊ शेट्ये, वर्षा ढेकणे, डॉ. हृषिकेश केळकर, भाई जठार, प्राजक्ता रूमडे, राजन फाळके, दादा दळी, विवेक सुर्वे, विनोद मस्के, बावा नाचणकर, मंदार खंडकर, मंदार मयेकर, आदी उपस्थित होते.
------------
चौकट १
भाजप संपवण्याचा विडा कोणी उचलला
जि. प. चे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे म्हणाले, गेल्या 20 वर्षांत विकासकाम न झाल्याने भाजपा कार्यकर्ता दुरावला. आज भाजपला वाचवायचे असेल तर हक्काचा आमदार निवडून दिला पाहिजे. भाजप संपवण्याचा विडा कोणी घेतला आहे का, हे पाहिले पाहिजे. आपण जागरूक राहायला पाहिजे. रस्ता झाला पाहिजे, काम झाले पाहिजे; पण हे आम्ही करू शकत नाही. रत्नागिरीत जे काही चालले आहे त्याला आपण मूकसंमती द्यायची का0 आपण जबाबदार ठरणार आहोत. भाजप जीवंत ठेवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक विचार करायला हवा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com