‘मालवणातील भटक्या 
कुत्र्यांचा बंदोबस्त करा’

‘मालवणातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा’

Published on

‘मालवणातील भटक्या
कुत्र्यांचा बंदोबस्त करा’
मालवण, ता. ९ : शहरातील भटक्या कुत्र्यांचा मालवण पालिकेने येत्या दहा ते पंधरा दिवसांत बंदोबस्त न केल्यास मनसेच्यावतीने पालिकेच्या बाहेर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मनसेचे माजी शहराध्यक्ष विशाल ओटवणेकर यांनी दिला आहे. शहरातील भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी यापूर्वीही मनसेने पालिकेकडे केली होती; मात्र याकडे पालिकेने दुर्लक्ष केले. त्यामुळे शहरात एका महिलेचा व तिच्या मुलाचा कुत्र्याने चावा घेतला. यात मुलगा गंभीर जखमी झाला आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पालिकेने तत्काळ आवश्यक उपाययोजना राबवाव्यात; अन्यथा पालिकेसमोर मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही ओटवणेकर यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com