रत्नागिरी-स्व. भागोजीशेठ कीरांचा वारसा जपला पाहिजे

रत्नागिरी-स्व. भागोजीशेठ कीरांचा वारसा जपला पाहिजे

Published on

17701

स्व. भागोजीशेठ कीरांचा वारसा जपला पाहिजे
उदय सामंत ; साळवी स्टॉप येथील पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ : दानशूर स्व. भागोजीशेठ कीर यांनी प्रत्येक समाजाचा आदर केला, तोच वारसा आता प्रत्येकाने जपला पाहिजे. रत्नागिरीत जातीधर्मात तेढ निर्माण करण्यापेक्षा प्रत्येक समाजाने थोर पुरुषांचा वारसा पुढे नेण्याची गरज आहे. शहरात सध्या पुतळ्यांची संख्या वाढली असून, या पुतळ्यांकडे पाहून प्रत्येकाने त्यांनी दिलेली शिकवण आचरणात आणली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.
शहरातील साळवी स्टॉप येथे स्व. भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्यांच्या कामाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मुख्याधिकारी तुषार बाबर, अखिल भारतीय भंडारी समाजाचे नेते नवीनचंद्र बांदिवडेकर, भंडारी समाज तालुकाध्यक्ष राजू कीर यांच्यासह सुनील भोंगले, प्रसन्न आंबुलकर, भागोजीशेठ यांचे पणतू आशिष कीर आदी उपस्थित होते. या प्रसंगी भंडारी समाजाच्यावतीने पालकमंत्री उदय सामंत यांचा सत्कार करण्यात आला. उदय सामंत म्हणाले, स्व. भागोजीशेठ कीर यांनी ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला त्या गाडगेबाबांचे स्मारकही लवकरच उभारले जाणार आहे. भागोजीशेठ कीर यांनी ज्या खडतर परिस्थितीतून मुंबईला जाऊन सचोटीने काम करत मोठे विश्व निर्माण केले त्यांनी सामाजिक जातीभेद केला नाही. त्यांच्या याच गोष्टीचा वारसा प्रत्येकाने पुढे चालवला पाहिजे.

चौकट...
कीर यांचे स्मारक लवकरच उभारणार
नवीनचंद्र बांदिवडेकर म्हणाले, स्व. भागोजीशेठ कीर हे दानशूर व्यक्तीमत्व होते. त्यांनी 9 एकर जागा विकत घेऊन हिंदू स्मशानभूमीसाठी दान दिली. याचबरोबर अनेक कार्यात त्यांनी सढळहस्ते दान दिल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी येथे त्यांच्या पुतळ्याबरोबरच त्यांचे स्मारकही व्हावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. हे स्मारकही लवकर करण्याचे आश्वासन पालकमंत्री सामंत यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com