रत्नागिरी ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची गरज

रत्नागिरी ः पाणीटंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची गरज

Published on

पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसाक्षरतेची गरज
कीर्तीकिरण पुजार ; ग्रामपंचायतीमधील ४७० जणांना प्रशिक्षण
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः मागील काही वर्षापासून जिल्ह्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येत आहेत. त्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचवून पाण्याचा वापर कमी करण्यासाठी व भविष्यातील टंचाई कमी करण्यासाठी जलसाक्षरतेची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी केले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद आणि मुख्य संसाधन केंद्र, जे. पी. एस. फाउंडेशनतर्फे रत्नागिरीतील हॉटेल विवा एक्झिक्युटिव्ह येथे झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. या शिबिराचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार, प्रकल्प संचालक राहुल देसाई, प्रकल्प संचालक श्रीकांत हावळे, कार्यकारी अभियंता मयुरी पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी पुजार म्हणाले, अनमोल पाण्याचे मूल्य समजून घेण्यासाठी जलसाक्षरतेची गरज आहे. योग्य विशेषतः जेव्हा जलस्रोत समजून घेणे, व्यवस्थापित करणे आणि वापरणे या बाबी येतात तेव्हा शिक्षण अधिक महत्वाचे बनते. या शिबिरात सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता महेश आरळेकर, आष्टा महाविद्यालयातील प्रा. पांडुरंग पिसाळ, वॉटर फिल्ड टेक्नोलॉजीचे सल्लागार अनिरूद्ध पळणीकर, हर्षदा वाळके, गोविंद भारद्वाज, वैष्णवी गुरव, सुनील आडके आदींनी मार्गदर्शन केले.

चौकट
४७० प्रतिनिधी उपस्थित
प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीमधील ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, अनुसूचित जातीजमाती प्रभागसंघातील महिला, जलसुरक्षक व प्राथमिक सहाय्यकारी संस्था प्रतिनिधी असे ४७० प्रतिनिधी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com