सावंतवाडी कॅथॉलिकच्या शववाहनाचे मंत्री केसरकरांच्या हस्ते लोकार्पण

सावंतवाडी कॅथॉलिकच्या शववाहनाचे मंत्री केसरकरांच्या हस्ते लोकार्पण

Published on

17840

‘कॅथॉलिक’च्या शववाहनाचे लोकार्पण
सावंतवाडी ः सावंतवाडी कॅथॉलिक असोसिएशन सावंतवाडीच्या शववाहनाचे लोकार्पण आज नवसरणी येथे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी याप्रसंगी कॅथॉलिक असोसिएशनचे चेअरमन जॉय डान्टस, व्हाईस चेअरमन ऑगस्तीन फर्नांडिस, सेक्रेटरी जॉनी फेराव, फादर मिलेट डिसोझा, कॅथॉलिक बँक चेअरमन अनामेरी डिसोझा, सेक्रेटरी मार्टीन आल्मेडा, सैनिक पतसंस्थेचे श्री. ओटवणेकर, सुनील राऊळ, प्रतिक बांदेकर, अर्चित पोकळे, जेम्स बोर्जीस, जोसेफ आल्मेडा आदींसह कॅथॉलिकचे पदाधिकारी उपस्थित होते. मंत्री केसरकर यांनी, येथील ख्रिस्ती समाज बांधव नेहमीच सामाजिक उपक्रम राबवित आला आहे. जनतेप्रती असलेली भावना यातून नेहमीच दिसून आली आहे. त्यामुळे तुमच्या समाजिक कार्यात स्थानिक आमदार म्हणून माझे सर्वोतोपरी सहकार्य राहील. आपण राबवत असलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांना माझ्या शुभेच्छा आहेत. ख्रिस्ती बांधवांचे जुने चर्च देखील नव्याने उभारण्यात येत असून स्थानिक आमदार म्हणून सर्वोतोपरी सहकार्य आपणस राहील, अशी ग्वाही दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com