रत्नागिरी-टुडे पान १ संक्षिप्त पट्टा

रत्नागिरी-टुडे पान १ संक्षिप्त पट्टा

Published on

ज्येष्ठ नागरिक संघाची
निवडणूक बिनविरोध
रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाची निवडणूक बिनविरोध झाली. कार्यकारिणीची सभा अध्यक्ष सुभाष थरवळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या प्रसंगी त्यांची व सर्व कार्यकारिणीची फेरनिवड करण्यात आली. डॉ. विजयराव निंबाळकर कार्याध्यक्ष, पद्मजा बापट उपाध्यक्ष, दिलीप पवार कार्यवाह यांची फेरनिवड झाली. कार्यवाह २ पदी आशा नागवेकर आणि कोषाध्यक्षपदी सुरेश पावसकर यांची निवड झाली. श्रीहरी सरपोतदार, शरद रेडीज, भालचंद्र बापट, प्रकाश मांजरेकर आणि सुरेंद्र ठाकूर यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड केली.
--------
पाचल येथे
गजानृत्य स्पर्धा
राजापूर : पाचल पंचक्रोशी धनगर समाजातर्फे दसर्‍याचे औचित्य साधून जिल्हास्तरीय गजानृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (ता. १३) ही स्पर्धा पाचल येथे होणार आहे. या स्पर्धेमध्ये जिल्हाभरातून १२ संघ सहभागी होत आहेत. ढोल, थाळी आणि ताशांच्या गजरात धनगरी परंपरा असलेल्या गजा नृत्याची झलक दाखवणार आहेत.
--------------

स्वच्छता रॅलीला
रत्नागिरीत प्रतिसाद
रत्नागिरी : येथील देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयातील आजीवन अध्ययन व विस्तार विभागाने स्वच्छता रॅली काढून मांडवी किनारी स्वच्छतामोहीम राबवली. सुरवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी मांडवी किनारपट्टीची स्वच्छता केली. या उपक्रमातून स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा संदेश देण्यात आला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्व कळले व त्यांनी सक्रिय सहभाग घेऊन समाजाप्रती आपले कर्तव्य पार पाडले. या वेळी आजीवन अध्ययन व विस्तार विभागप्रमुख प्रा. आसावरी मयेकर, प्रा. विनय कलमकर व प्रा. आरती पाध्ये उपस्थित होते.
-----------
सेवा सप्ताहानिमित्त
रत्नागिरीत शिबिर
रत्नागिरी : सेवा सप्ताहानिमित्त पालिका शाळा क्र. ३ येथे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्या वतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले. माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, साईनाथ नागवेकर, सत्यवती बोरकर, कैलास विलणकर, विलास विलणकर, मोहम्मद सुवर्णदुर्गकर, शिवाजी कारेकर, बबलू विलणकर आदी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com