आयटीआयमधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
‘आयटीआय’मधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे
संगमेश्वर ः औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी लायन्स क्लबने स्वसंरक्षणासाठी प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रशिक्षणाची सुरवात लायन्स क्लबचे अध्यक्ष रिंकू कोळवणकर, दिलीप रहाटे, गुलाम पारेख, नंदू पटेल, तसेच प्राचार्य रवींद्र कोकरे, विजय गिरकर, अश्रफ मुल्ला, अजय गुरव, ओंकार भडकमकर यांच्या उपस्थितीत झाली. स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी साईप्रसाद शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
पुणे एसटी बंद केल्यामुळे गैरसोय
साखरपा ः रत्नागिरी-पुणे ही रातराणी अचानक बंद केल्यामुळे साखरपा परिसरातील प्रवाशांची पंचाईत झाली आहे. ही एसटी कमी भारमानाचे कारण देऊन बंद करण्यात आली. रत्नागिरीहून रात्री ८.३० वा. पुणे-वल्लभनगर ही शिवशाही बस नियमित सुरू होती. वल्लभनगर येथे जाणारी ही एकमेव बस असल्यामुळे साखरपा पंचक्रोशीतील प्रवाशांसाठी अत्यंत सोयीची होती. बसला सातत्याने प्रवासी मिळत असताना गेल्या काही दिवसांपासून ही बस अचानक बंद केली. हीच बस आता मार्ग बदलून चिपळूणमार्गे सुरू केली आहे. बसला साखरपा परिसरातून चांगला प्रतिसाद मिळत असताना ती अचानक का बंद केली, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत, तसेच ही बस पूर्ववत सुरू करावी, अशी मागणीही प्रवाशांकडून होत आहे. रत्नागिरी आगाराला शिवशाही बस देणे शक्य नसेल तर किमान साधी बस तरी मार्गावरून पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

