राजापूर ग्रामीण रुग्णालयाला दहा ट्युबलाईट भेट
राजापूर ग्रामीण रुग्णालयाला
दहा ट्युबलाईट भेट
राजापूर : राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस रवींद्र नागरेकर यांनी राजापूर ग्रामीण रुग्णालयाला दहा ट्युबलाईट भेट दिल्या आहेत. या वेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राजन देसाई, पूर्व मंडळाचे भाजप तालुकाध्यक्ष सुरेश गुरव, विजय कुरूप, सरचिटणीस अमोल सिनकर उपस्थित होते.
------
विठ्ठल मंदिर देवस्थानमध्ये
आज महालक्ष्मी पूजन
साडवली : देवरूख मधलीआळी येथील श्री देव विठ्ठल मंदिर देवस्थान येथे गुरूवारी (ता. १०) महालक्ष्मी पूजन उत्सव सोहळा होणार आहे. दुपारी विधीवत महालक्ष्मीचे पूजन होणार आहे. सायंकाळी ७ नंतर पूजन, दर्शन सोहळा होणार आहे. अनिल राजवाडे, रवींद्र राजवाडे हे तांदळाच्या पिठापासून देवीचा मुखवटा तयार करतात. गेली अनेक वर्षांची ही परंपरा आजही जपली जात आहे. भाविकांनी महालक्ष्मी पूजन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे देवस्थानतर्फे आवाहन करण्यात आले आहे.
--------
किरबेट-भोवडेच्या
सरपंचपदी प्रिया कांबळे
साखरपा ः किरबेट-भोवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत प्रिया कांबळे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज नायब तहसीलदार गोताड यांनी पाहिले. गेल्या साठ वर्षांमध्ये प्रथमच बौद्ध समाजातील लोकप्रतिनिधीला सरपंचपदाचा मान मिळाला आहे. कांबळे यांच्या निवडीबद्दल माजी सभापती जयसिंग माने तसेच केतन दुधाणे, दत्ता वाघधरे, उदय पत्की, सचिन अंकुशराव, देवडे सरपंच विलास कांगणे, उपसरपंच सतीश कांबळे, अस्मिता अडबल, रेवती निंबाळकर, माधवी जायगडे आदींनी अभिनंदन केले आहे.
----------
उपजिल्हाप्रमुखपदी
भाग्यश्री सुर्वे
साखरपा ः शिवसेनेच्या सक्रिय नेत्या भाग्यश्री सुर्वे यांची पक्षाच्या उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नसिंधू योजना सदस्य किरण सामंत, जिल्हाप्रमुख राहुल पंडित, महिला जिल्हाप्रमुख शिल्पा सुर्वे यांच्या उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. भाग्यश्री डेव्हलपर्सतर्फे साखरपा येथे स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात त्यांची निवड जाहीर करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

