रत्नागिरी ः तिकीट विक्री ते उद्योजिकेपर्यंतचा प्रवास

रत्नागिरी ः तिकीट विक्री ते उद्योजिकेपर्यंतचा प्रवास

Published on

नवदुर्गा - लोगो

17744

तिकीट विक्री ते उद्योजिकेपर्यंतचा प्रवास
स्वप्ना पाजवे; उद्योजक पुरस्काराने सन्मानित
नरेश पांचाळः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ः सर.. या नाटकाची थीम उत्कृष्ट आहे. कौटुंबिक हृदयस्पर्शी असा विषय आहे. तिकीट घेऊन नाटक पाहाच. सायंकाळी आम्ही वाट पाहात आहोत. उद्या आपल्याला आठवणीसाठी आमचा एसएमएस मिळेलच, असे डोअर टू डोअर नाटकांच्या तिकिटांची विक्री व भावनात्मक संभाषण करून मायबाप रसिक प्रेक्षकांवर छाप पाडण्यापासून युवा महिला वितरक ते अगदी उद्योजक पुरस्कारापर्यंत येथील माहेरवशीण स्वप्ना पाजवे-पुळेकर यांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
शहरातील घुडेवठार येथे राहणाऱ्या स्वप्ना पाजवे या मुळच्या तालुक्यातील भंडारपुळे येथील माहेरचं नाव स्वप्ना पुळेकर; मात्र वडिलांच्या एसटीतील नोकरीमुळे त्यांचं वास्तव्य ठाणे येथे होते. एमएपर्यंत शिक्षणही त्यांचे ठाण्याच्या जोशी-बेडेकर महाविद्यालय येथे झाले. त्यानंतर वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर त्या रत्नागिरीत वास्तव्याला आल्या. लहान वयातच त्यांना नाटक पाहण्याचे बाळकडू आई-वडिलांकडून मिळाले होते. चांगल्या कलाकारांना भेटणे हा छंद होता. नाट्यक्षेत्रातील नवनवीन प्रयोग पाहात असताना ठाणे-मुंबईतील कलाकारांना रत्नागिरीत आणावं. रत्नागिरीत वाढीस लागलेल्या नाट्यसंपदेसाठी आपल्यालाही काही करता येईल ही जाणीव झाली आणि धैर्य करून नाट्यवितरणकडे वळल्या आणि रत्नागिरीच्या पहिल्या महिला नाट्य वितरक ठरल्या. स्वप्ना पाजवे लग्नानंतर मुंबईत स्थायिक झाल्या. तिथेही त्यांनी काही काळ नाट्यक्षेत्राच्या अनुभवाने नवनवीन नाटके रसिकांपर्यंत पोहचवली आहेत. त्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक कामासाठी त्यांना राष्ट्रीय पारितोषिक मिळाले आहे. त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे त्यांना मुंबईतील दी बिझनेस फेम या संस्थेचा विपणन व वित्त समुपदेशक पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ही संस्था कर्तव्यदक्ष उद्योजक आणि त्यांच्या कुटुंबांना एकत्र आणते. त्यांच्या पराक्रमाचा उत्सव साजरा केला जातो.

कोट
नाट्यक्षेत्रात काम करताना अनेक अनुभव पाठीशी होतेच. कामही अंगवळणी पडले होते. मुंबईत सध्या दी बिझनेस फेम या संस्थेत काम करताना अनेक स्टार अभिनेत्यांपर्यंत पोचता आले आणि माझा नाट्यक्षेत्र ते समुपदेशक असा प्रवास सुकर झाला. महिलांनी हे करावं, हे करू नये या मताची मी नाही. जे काम समोर आलं ते स्वच्छेने आणि आनंदी वृत्तीने केल्यास यश मिळतेच.
- स्वप्ना पाजवे-पुळेकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com