‘ओबीसी’ मंडळातर्फे
व्याजात ५० टक्के सूट

‘ओबीसी’ मंडळातर्फे व्याजात ५० टक्के सूट

Published on

‘ओबीसी’ मंडळातर्फे
व्याजात ५० टक्के सूट
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाच्या थकीत कर्ज रक्कम असलेल्या लाभार्थींनी ओबीसी महामंडळाच्या थकीत कर्ज प्रकरणात संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेचा एकरकमी भरणा करणाऱ्या लाभार्थीस ५० टक्के सवलत देण्याबाबतची एकरकमी परतावा योजना ३१ मार्च २०२५ पर्यंत राबविण्यात येत आहे. महामंडळाच्या थकबाकीदार लाभार्थींनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक प्रीती पटेल यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित मुंबई यांची उपकंपनी शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळ लि., सिंधुदुर्गच्यावतीने विविध कर्ज योजनेंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागास (ओबीसी) प्रवर्गातील लाभार्थींना स्वयंरोजगाराकरिता अल्प व्याजदराने कर्ज वितरित करण्यात आले असल्याचे जिल्हा व्यवस्थापक पटेल यांनी कळविले आहे.
.............
‘विद्यार्थी सुरक्षेबाबत
सूचना देणे आवश्‍यक’
सिंधुदुर्गनगरी ः राज्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेळोवेळी शासन निर्णय/परिपत्रकांन्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. उच्च न्यायालय मुंबई येथे दाखल सु-मोटो याचिकेच्या अनुषंगाने ३ सप्टेंबरला दिलेल्या आदेशानुसार गठित केलेल्या समितीचा विस्तार व कार्यक्षेत्राबाबतची निश्चिती केली आहे. त्यानुसार समितीची बैठक आयोजित करण्यात आली. समाजातील विविध घटकांतून विद्यार्थी सुरक्षा विषयी लिंकवर सूचना/अभिप्राय देण्याचे आवाहन कार्यालयाने नागरिकांना केले आहे. या लिंकवर अभिप्राय नोंदविण्याचा अंतिम तारीख १२ ऑक्टोबरपर्यंत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी दिलेल्या लिंकवर विद्यार्थी सुरक्षाबाबत आपल्या सूचना/अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. गणपती कमळकर यांनी केले आहे.
.........
हिंदी निबंध लेखन
स्पर्धेत बिजापुरी प्रथम
धुदुर्गनगरी ः आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी येथे हिंदी दिनानिमित्त हिंदी पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यानिमित्त विविध कार्यकमांचे आयोजन केले होते. हिंदी निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेतील प्रथम पुरस्कार इम्तियाज बिजापुरी (तंत्रज्ञ), द्वितीय पुरस्कार मोहन कावळे (अभियांत्रिकी सहायक) व तृतीय पुरस्कार ज्ञानदेव परब (तंत्रज्ञ) यांना मिळाले. कार्यक्रमाचे आयोजन विमलन ज्योतिनाथन, उपनिदेशक (अभियांत्रिकी), पियुष गौतम, सहायक निदेशक (राजभाषा) व सुजाता कहाळेकर सहायक निदेशक (कार्यकम) यांच्या उपस्थितीत झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com