सिंधुदुर्गनगरीत 
युवा महोत्सव

सिंधुदुर्गनगरीत युवा महोत्सव

Published on

सिंधुदुर्गनगरीत
युवा महोत्सव
सिंधुदुर्गनगरी ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे २०२४-२५ या वर्षातील जिल्हास्तर युवा महोत्सव २१ नोव्हेंबरला जिल्हा नियोजन समिती हॉल सिंधुदुर्गनगरी (नवीन) येथे आयोजित करण्यात असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी कळविले आहे. राष्ट्रीय युवा महोत्सव २०२४-२५ मध्ये संकल्पना आधारित बाबींसाठी ‘विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना’ ही संकल्पना आहे. या संकल्पनेवर आधारीत जिल्हा युवा महोत्सवात विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. राज्यात २०२४-२५ या वर्षातील युवा महोत्सवाचे आयोजन क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्गतर्फे केले जाणार आहे. सांस्कृतिक-समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक लोकगीत. कौशल्य विकास-कथा लेखन, चित्रकला, वक्तृत्व स्पर्धा, कविता स्पर्धा. संकल्पना आधरित स्पर्धा-विज्ञान व तंत्रज्ञान यामधील नवसंकल्पना. युवा कृती - हस्तकला, वस्त्रोद्योग, अॅगो प्रोडक्ट यावर आधारीत स्पर्धा होणार आहेत. १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येईल. क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com