दुकानातून १० हजार लंपास
दुकानातून १० हजार पळविले
रत्नागिरी ः शहरातील मारुती मंदिर-मजगाव रोड येथील एका दुकानातून १० हजाराची रोख रक्कम चोरट्याने पळवली. शहर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल संजय घोडके असे संशयिताचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ७) दुपारी चारच्या सुमारास अन्नपूर्णा संकुल येथील ऑप्टिकल शॉपमध्ये घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी पंकज रमेश सुर्वे यांच्या मालकीचे यश ऑप्टिकल दुकान आहे. या दुकानातून १० हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी फिर्यादी सुर्वे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अंमलदार करत आहेत.
तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः तालुक्यातील भोके-रेवाळेवाडी येथील ताप आलेल्या तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संदीप वासुदेव रेवाळे (वय २९, रा. रेवाळेवाडी, भोके, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी (ता. ८) मध्यरात्री अडीचच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. रविवारी (ता. ६) संदीपला ताप आला म्हणून एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरू असताना त्याचा मंगळवारी मध्यरात्री मृत्यू झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

