रुग्णालयासाठी तातडीने भूखंड द्या

रुग्णालयासाठी तातडीने भूखंड द्या

Published on

17918


रुग्णालयासाठी तातडीने भूखंड द्या

‘रुग्णालय बचाव’ची मागणी ः आदेश देऊनही बैठक का नाही?

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ९ ः जिल्हा सामान्य रुग्णालयाची सर्व जागा जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला गेल्याने अस्तित्व धोक्यात आलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीसाठी तत्काळ भूखंड देण्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलेले असताना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अद्याप सिंधुदुर्गनगरी प्राधिकरणची बैठक बोलाविली नाही. यामुळे जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समिती व पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांतर्फे शुक्रवारी (ता.११) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष महेश पारकर यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय हे स्थलांतरास विरोध म्हणून २६ सप्टेंबरच्या जनता दरबारमध्ये जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समितीच्यावतीने निवेदन दिले होते. त्यावेळी पालकमंत्री यांनी सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणात जिल्हा रुग्णालयासाठी स्वतंत्र भुखंड द्यावा, यासाठी ३० सप्टेंबरला जिल्हाधिकारी यांनी बैठक घेऊन जिल्हा रुग्णालयासाठी जागा निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अस्तित्वात आल्यानंतर जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गची सर्व शासकीय जागा ही वैद्यकीय महाविद्यालयास वर्ग करण्यात आली आहे. परिणामी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग यांना पर्यायी जागा मिळावी म्हणून २०२३ पासून सातत्याने भूखंडाची मागणी जिल्हा रुग्णालय प्रशासन नवनगर विकास प्राधिकरण, सिंधुदुर्गनगरी यांच्या जवळून करण्यात आली आहे; मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही अथवा भूखंडाबाबत कोणताही निर्णय झाला नाही. परिणामी जागे अभावी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग यांना मंजूर झालेले बीएससी नर्सिंग (१०० विद्यार्थी क्षमता) महाविद्यालय नामंजूर होण्याची शक्यता आहे. जागेअभावी कॅथलॅब, महिला व बाल रुग्णालय, मच्छिंद्रनाथ कांबळी नाट्यगृह अशी अनेक शासकीय योजनांमधून मंजूर झालेली सुविधा इतरत्र हलविली आहेत. या सर्व गोष्टींचा गांर्भियपूर्वक विचार करता नवनगर विकास प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांच्याजवळ मुबलक प्रमाणात भूखंड उपलब्ध आहेत. परंतु, प्रशासनाचा हलगर्जीपणा, कामचुकारपणा यामुळे सिंधुदुर्गनगरीच्या अपेक्षीत विकासाला खिळ बसत आहे. तरी जिल्हा रुग्णालय, सिंधुदुर्ग बचाव समितीने ३० सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. या बैठकीत ३ किंवा ४ ऑक्टोबरला स्वतंत्र प्राधिकरणची बैठक घेण्याचे मान्य केले होते; मात्र आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. हा प्रश्न आचारसंहितेपूर्वी मार्गी लागणे अपेक्षित होते; परंतु यावर कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने बचाव समितीने ३० सप्टेंबरला दिलेल्या लाक्षणिक उपोषणाच्या इशाऱ्याप्रमाणे शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जिल्हा रुग्णालयास भूखंड मिळण्यासाठी धरणे आंदोलनाला बसणार आहोत, असे अध्यक्ष पारकर यांनी सांगितले. यावेळी रामचंद्र घोगळे, हार्दिक शिगले, विलास हडकर, सुनील जाधव, शुभम परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com