रत्नागिरी - जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त

रत्नागिरी - जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती झाल्या टीबी मुक्त

Published on

17915

जिल्ह्यातील ४२ ग्रामपंचायती
झाल्या टीबीमुक्त
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ९ ः सेंट्रल टीबी डिव्हिजन यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, रत्नागिरी जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायती टीबीमुक्त ग्रामपंचायतीसाठी पात्र ठरल्या आहेत. त्या ग्रामपंचायतींचा मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झालेल्या कार्यक्रमात ग्रामपंचायतींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, व्यवस्थापक फिनोलेक्स कंपनी श्रीदत्त अलगुर, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनुप करमरकर, डॉ. ज्योत्स्ना वाघमारे आणि जिल्हा क्षयरोग केंद्राचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. महेंद्र गावडे यांनी क्षयरोगाविषयी सविस्तर माहिती दिली. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सेंट्रल टीबी डिव्हिजनने २०२५ अखेर देशातून क्षयरोग दुरीकरणाचे ध्येय ठेवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ग्रामपंचायत स्तरावर क्षयरोगाशी निगडित समस्यांचे निराकरण करणे आणि क्षयरोग दुरीकरणासाठी पंचायतीत निरोगी स्पर्धा निर्माण करणे, असे ध्येय ठेवले आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com