दुचाकी धडक बसून
जामसंडेत एक जखमी

दुचाकी धडक बसून जामसंडेत एक जखमी

Published on

दुचाकी धडक बसून
जामसंडेत एक जखमी
देवगड : जामसंडे येथे दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात पादचारी जखमी झाला. हा अपघात शुक्रवारी (ता.४) सकाळच्या सुमारास जामसंडे दिर्बादेवी थांब्याजवळ घडला होता. याबाबत आज येथील पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड-नांदगाव या मुख्य रस्त्यावरून पायी जात असताना जामसंडे दिर्बादेवी थांब्याजवळ दुचाकीची पादचाऱ्याला धडक बसली. यामध्ये पादचारी जखमी झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर ओरोस येथे हलवण्यात आले. सध्या ते गोवा येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत आज येथील पोलिस ठाण्यात माहिती देण्यात आली. त्यानुसार अपघाताची नोंद करण्यात आली. अधिक तपास पोलिस हवालदार उदय शिरगावकर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com