‘रेल्वे’कडून सावंतवाडीकरांच्या तोंडाला पाने

‘रेल्वे’कडून सावंतवाडीकरांच्या तोंडाला पाने

Published on

17953

‘रेल्वे’कडून सावंतवाडीकरांच्या तोंडाला पाने

मिहीर मठकर ः रेल रोको आंदोलनाचा इशारा


सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ ः कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले जात आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा, यासाठी रेल रोकोसारखे आंदोलन छेडण्यासाठी प्रशासन आम्हाला भाग पाडत आहे. त्यामुळे मागण्या मान्य न झाल्यास आचारसंहितेनंतर आंदोलन छेडण्याचा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी दिला.
श्री. मठकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, नंदू तारी, सागर नाणोसकर, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर आदी उपस्थित होते. श्री. मठकर म्हणाले, "सावंतवाडी टर्मिनस आणि गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आंदोलन, साकारत्मक पाठपुरावा सुरू आहे. मात्र, मंगलोर गाडी थांबली नाही. गरिबरथ व राजधानी थांबेल, अशी अपेक्षा आहे. कोकण रेल्वे प्रशासन व सरकारकडून सावंतवाडीकरांच्या तोंडाला पाने पुसण्याच काम होत आहे. त्यामुळे आचारसंहितेनतर जनआंदोलन उभे करावे लागेल अथवा रेलरोको आंदोलन छेडण्याचा विचार करावा लागेल. सावंतवाडी टर्मिनस होऊन जादाच्या गाड्या थांबल्या पाहिजेत. शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली तेव्हा वंदे भारत थांबण्यासंदभात मागणी केली. मात्र, यश मिळाले नाही. मंत्री केसरकर यांनी हा प्रश्न गांभीर्याना घेतला नाही. कोकण रेल्वे आणि मंत्री केसरकर यांना गांभिर्य नसल्याने पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही देत आहोत. स्थानकाचे सुशोभीकरण करत लोकार्पण केले. मात्र, विद्युत रोषणाई रात्री गायब होते. स्थानक अंधारात असते. मग, कोट्यवधी रूपये खर्च करून सुशोभिकरण केले कशासाठी? याठिकाणी यापूर्वी अतिप्रसंगासारखा प्रकार, अपघात घडले आहेत. त्यामुळे वीज कायमस्वरूपी सुरू राहीली पाहिजे.’’
--
‘इथल्या नेत्यांमध्ये धमक नाही’
श्री. साळगावकर म्हणाले, ‘‘(कै.) जयानंद मठकर यांनी सावंतवाडी टर्मिनसबाबतीत आंदोलन छेडले होते. आता रेल्वे प्रवासी संघटनेने आंदोलन केले आहे. सतत पाठपुरावा सुरू आहे. इथल्या नेत्यांमध्ये धमक नाही. त्यामुळे गाड्यांना थांबा आणि टर्मिनस काम झाले नाही. सावंतवाडी शहर आणि परिसरात रेल्वे गाड्यांना थांबा मिळाला तर फायदा होणार आहे. त्यामुळे जनआंदोलन छेडले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com