

आचरा तिठ्यावर तलाठ्याच्या
अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न
अवैध वाळू उपसा; शिवीगाळ करून धमकीही
सकाळ वृत्तसेवा
आचरा, ता. ९ ः अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी तैनात पथकातील तलाठ्याच्या अंगावर मोटार घालण्याचा प्रकार आचरा तिठा येथे मंगळवारी काल (ता. ८) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. तलाठी संतोष महादेव जाधव यांनी याबाबत येथील पोलिस ठाण्यात आपल्याला हुलकावणी देत शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः सध्या हडी, कालावल खाडीपट्ट्यात अवैध वाळू उपसा मोठ्या प्रमाणात सुरू आहे. रात्रीच्या वेळेस वाळू माफियांकडून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनाकडे येत आहेत. या पार्श्वभूमीवर तहसीलदार वर्षा झालटे यांनी अशी वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी महसूलच्या पथकांची नियुक्ती केली आहे. मंगळवारी मध्यरात्री आचरा तिठा परिसरात वाळू वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या पथकातील तलाठी जाधव कार्यरत होते. याचवेळी कणकवलीच्या रस्त्याने मालवणच्या दिशेने जाणाऱ्या मोटारीने (एमएच ०१ ए एक्स ४५६३) त्यांना हुलकावणी दिली. ‘तुला बाजूला होता येत नाही का,’ असे विचारत शिवीगाळ केली. तसेच तुला बघून घेतो, अशी धमकीही दिली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पथकातील कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. याप्रकरणी तलाठी जाधव यांनी आज येथील पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीमध्ये त्यांनी संशयिताचे नाव दिल्याची माहिती मिळाली आहे.
चौकट
...तोपर्यंत गस्त घालणार नाही
या घटनेनंतर तलाठ्यांनी आज सायंकाळी बैठक घेत गस्त घालण्यासाठी नायब तहसीलदार दर्जाचा अधिकारी, सशस्त्र पोलिस वाहन, तसेच अन्य विभागांचे अधिकारी यांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत आम्ही गस्त घालणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी आज सायंकाळी उशिरा तहसीलदार झालटे यांना दिले.
----------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.