करणीच्या नावाखाली लूटीत महिला पोलिसाचा सहभाग
सिंधुदुर्गच्या महिला पोलिसाचा
८५ लाखांच्या फसवणुकीत सहभाग
कोल्हापुरात गुन्हा दाखल; संबंधित पसार
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ९ : ‘करणी’ काढण्याच्या नावाखाली येथील गंगावेश परिसरातील सुभाष कुलकर्णी (वय ७७) यांना ८५ लाखांचा गंडा घालणाऱ्या टोळीत सिंधुदुर्ग पोलिस खात्यातील महिला अंमलदाराचा सहभाग पुढे आला आहे. तृप्ती मुळीक नावाच्या या महिलेवर गुन्हा दाखल असून, ती सिंधुदुर्ग पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून ती पसार झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी सिंधुदुर्ग पोलिसांशी संपर्क केल्याचे पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी सांगितले.
याबाबत झाडे यांनी दिलेली माहिती अशी ः फिर्यादी कुलकर्णी यांच्या घरावर काळी जादू करून करणी केल्याची भीती घालत रत्नागिरीतील भोंदू दादा पाटील महाराज याने साथीदारांसह सोने, चांदी ऐवज, प्रापंचिक साहित्यासह ८४ लाख ६९ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी अण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री गणपत काळभोर, तसेच तृप्ती मुळीक आदींची नावे समोर आली. काही दिवासांपूर्वी शशिकांत गोळे व कुंडलिक झगडे या दोघांना अटकही करण्यात आली आहे.
संशयितांनी कुलकर्णी यांना कणकवली येथे तृप्ती मुळीकच्या घरी नेले होते. त्या ठिकाणी पूजा, विधीबाबत माहिती देण्यात आली होती. मुळीक पोलिस असल्याचे सांगून कुलकर्णींचा विश्वास संपादन करण्यात आला होता; मात्र ती खरोखरच पोलिस दलात आहे की, तोतया पोलिस याविषयी संभ्रम होता. सिंधुदुर्ग पोलिसांकडे केलेल्या चौकशीत ती मुख्यालयात कार्यरत असल्याचे समोर आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

