सावंतवाडीतील शिंदे कुटुंबियांना ''सामाजिक बांधिलकी''तर्फे मदत
18791
सावंतवाडीतील शिंदे कुटुंबियांना
‘सामाजिक बांधिलकी’तर्फे मदत
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १४ः शहरातील शिंदे यांचे मागच्या महिन्यामध्ये निधन झाले व त्यांच्या पत्नीसह दोन लहान मुली निराधार झाल्या. याबाबत माहिती मिळताच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व काळसे पंचक्रोशी अपंग सेवा संस्था यांच्या माध्यमातून शिंदे कुटुंबियांना पाच हजार रुपये आणि जीवनावश्यक साहित्य देण्यात आले. यासाठी ‘सामाजिक बांधिलकी’चे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, सचिव समीरा खालील, कार्याध्यक्ष संजय पेडणेकर, काळसे पंचक्रोशी सेवा संस्थेचे अध्यक्ष विनोद धुरी, रुपा मुद्राळे, अशोक पेडणेकर, शरदीनी बागवे, प्रसाद कोदे, सुजय सावंत, हेलन निबरे, शरद पेडणेकर, शेखर सुभेदार व शाम हळदणकर यांनी सहकार्य केले.
शहरात व गावागावांमध्ये निराधार वृद्ध व गोरगरीब आजारी व्यक्ती, विधवा यांना सहकार्य करण्यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून आर्थिक साहाय्य व जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या व दानशूरांच्या मदतीने घरपोच करण्याचे काम करण्यात येते. सावंतवाडी तालुक्यासह जिल्ह्यातील नवरात्रोत्सव मंडळांनी सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून देवीकडे जमलेले टिकाऊ अन्नपदार्थ काही प्रमाणात प्रतिष्ठानकडे जमा करावेत. यामुळे गरजू व निराधार व्यक्तींना मदत करता येईल, असे आवाहन प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.