

हर्चे महाविद्यालयात
स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन
लांजा ः आ. रा. स. अॅकॅडमी ऑफ एज्युकेशन ॲण्ड करीअर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि प्रशिक्षण अॅकॅडमी रत्नागिरी आणि साने गुरुजी विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने साटवली, हर्चे येथील कनिष्ठ महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील करीअर मार्गदर्शन शिबिर झाले. शिबिरामध्ये विविध शासकीय स्पर्धा परीक्षांविषयी व त्यांच्या तयारीविषयी मार्गदर्शन राकेश सत्वे यांनी केले. याप्रसंगी साने गुरुजी विचार मंचाचे अध्यक्ष नाना मानकर यांनी साने गुरुजींच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले. आ.रा.स. अॅकॅडमीच्या माध्यमातून तालुक्यात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षणासाठी लांजा येथे नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहे.
----------
गावखडी पंचक्रोशीत
वीजेचा लपंडाव
पावस ः गावखडी पंचक्रोशीत विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. याबाबत वारंवार निवेदने देऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. गावखडी गावातील कुंभारवाडी, पड्यारवाडी, नानकरवाडी, पवारवाडी, गुरववाडी या परिसरात गेले आठ दिवस वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत त्वरित कार्यवाही करण्यात यावी व वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करणारे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.