

दापोलीत आमदार योगेश कदमांपुढे आव्हान
थेट हल्लाबोलमुळे अडचणी; भाजपची उघड नाराजी
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. १७ ः महायुतीतील आरोप-प्रत्यारोपांमुळे दापोली विधानसभा मतदार संघ गेले काही दिवस चांगलाच चर्चेत आला आहे. विद्यमान आमदार योगेश कदम यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे.
दापोली शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे सूर्यकांत दळवी या मतदार संघातून पाचवेळा निवडून आले होते. २०१४ मध्ये युती तुटली. रामदास कदम-सूर्यकांत दळवी यांच्यातील वादाचा फटका शिवसेनेला बसला. दळवी पराभूत झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून संजय कदम आमदार झाले. २०१६ पासून तत्कालीन पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम यांनी मतदार संघातील वाडीवस्त्या पिंजून काढत २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनाकडून तिकीट मिळवले. त्यांनी संजय कदम यांचा दहा हजार मतांनी पराभव केला. आमदार योगेश कदम यांनी गेल्या पाच वर्षात विकासकामांचा धडाका लावला आहे; परंतु शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वादग्रस्त विधानांमुळे मतदार संघातील महायुतीमधील घटक पक्ष भाजपाची स्थानिक नेतृत्वं दुखावली गेली आहेत. ही नाराजी या विधानसभा निवडणुकीत त्यांना भोवण्याची शक्यता आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना आपलेसे करून निवडणुकीला सामोरे जाण्याचे आव्हान योगेश कदम यांच्यापुढे आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी थेट हल्लाबोल केल्यामुळे भाजपने योगेश कदम उमेदवार नकोत, अशी भूमिका घेतली. ते सोडून कोणीही उमेदवार द्यावा अन्यथा महायुती करू, असाही पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भाजपने अशी भूमिका घेऊन आमदार योगेश कदम यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.