

rat१७p१७.jpg-
P२४N१९४८४
मुंबई : सहकार न्यायालयासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांना निवेदन देताना रत्नागिरी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. विलास पाटणे आणि अॅड. राकेश भाटकर.
सहकार न्यायालयासाठी जागा मिळणार
अॅड. विलास पाटणे ः मुंबई उच्च न्यायालय सकारात्मक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ : रत्नागिरी जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहकार न्यायालय नाही. अलिबाग येथील सहकार न्यायालयाचे न्यायाधीश रत्नागिरी येथे कॅम्प लावतात. त्यासाठी स्वतंत्र अशी जागा उपलब्ध नाही. यासाठी रत्नागिरी जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विलास पाटणे यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांना भेटून निवेदन दिले. न्यायालयाच्या नवीन इमारतीत जागा उपलब्ध करून देण्याबाबत विनंती केली असून, न्यायमूर्ती डिगे यांनी या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामुळे जागा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
पूर्वी रत्नागिरी जिल्हा सहकारी बँकेच्या सभागृहात न्यायालय भरवले जात होते; परंतु बँकेची नवीन इमारत बांधल्यानंतर तिथे जागा उपलब्ध नाही. यासाठी रत्नागिरी बार असोसिएशनने हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानुसार अध्यक्ष अॅड. पाटणे यांनी न्यायमूर्ती डिगे यांची भेट घेतली. त्या वेळी सोबत अॅडव्होकेट असोसिएशन ऑफ वेस्टर्न बारचे कोषाध्यक्ष ॲड. राकेश भाटकर उपस्थित होते. जिल्ह्याचे पालक न्यायाधीश माधव जामदार यांनी या प्रश्नात लक्ष घालू, असे आश्वासन दिल्याची माहिती ॲड. पाटणे यांनी दिली.
सध्या गाडीतळ येथील जिल्हा बँकेच्या शाखेमध्ये सहकार कोर्ट भरवले जाते; परंतु ती जागा सर्व दृष्टीने अत्यंत गैरसोयीची आहे. जिल्हा न्यायालयाच्या आवारामध्ये नवीन प्रशस्त इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये सहकार कोर्टाची सोय होणे सहजशक्य आहे. ठाणे येथे न्यायालयाची नवीन इमारत झाल्यावर सहकारी न्यायालयासाठी काही भाग देण्यात आला आहे. बारचे सदस्य आणि संपूर्ण जिल्ह्यातून सहकार न्यायालयात येणारे पक्षकार यांच्या अडचणींचा सहानभूतीपूर्वक विचार करून सहकार न्यायालयाच्या कँपसाठी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीची जागा उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.