

मराठी विषय शिक्षकांचा
डिसेंबरमध्ये स्नेहमेळावा
संगमेश्वर ः कनिष्ठ महाविद्यालय मराठी विषय शिक्षक महासंघाची सर्वसाधारण सभा नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण येथे झाली. या सभेसाठी जिल्हा कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी आणि तालुका प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी माजी सल्लागार प्रा. गिरीराज पांडे यांचा सन्मान करण्यात आला. १३ सप्टेंबर २०२४ चा अकरावी व बारावीसाठी मराठी विषय अनिवार्य केलेला अधिनियम आणि ३ ऑक्टोबर २०२४ रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला, याबद्दल अभिनंदनचा ठराव करण्यात आला. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. विठ्ठल केंद्र, सहसचिव प्रा. वसंत भुसारे, सहखजिनदार प्रा. क्षीरसागर यांनी मनोगत व्यक्त केली. तालुकास्तरावर कार्यकारणी गठीत करण्यासाठी प्रत्येक मराठी विषय शिक्षकांनी एकत्रित करण्याची सूचना यावेळी दिली गेली. मराठी विषय शिक्षकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात स्नेहमेळावा घेण्याचे ठरविणात आले.
------
मूल्यमापनासाठी बनसोडेंच्या
पुस्तकाची निवड
सावर्डे : संगमेश्वर तालुक्यातील करजुवे येथील माध्यमिक विद्यालय येथील रामराव बनसोडे यांच्या महापुरुषांची प्रेरणादायी चरित्रे या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली. त्यानिमित्त त्यांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य शशिकांत नलावडे, माजी पं स. सभापती सुभाष नलावडे, औद्योगिक वसाहत खेर्डीचे उपअभियंता विजय धामापूरकर, संचालक शामसुंदर माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, समग्र शिक्षा ग्रंथालय यांनी घेतलेल्या जिल्हास्तर स्पर्धेतून त्यांच्या पुस्तकाची राज्यस्तरीय मूल्यमापनासाठी निवड झाली आहे. याबद्दल संचालिका प्रिया नलावडे, संचालक अनंत केळकर, रमेश धामापूरकर, राजेश खोपकर, कीर्ती सागवेकर, मुख्याध्यापक अशोक कुवळेकर यांनी अभिनंदन केले.
-----
काव्यवाचन स्पर्धेत
जोगळेकर, सुर्वे प्रथम
साखरपा : माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन येथील कबनूरकर इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये साजरा करण्यात आला. काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला केंद्रशाळा साखरपा नं. १ चे शिक्षक बाबासाहेब लाड उपस्थित होते. मुख्याध्यापिका लिना कबनूरकर आणि बाबासाहेब लाड यांच्या हस्ते कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नववीतील विद्यार्थी कौस्तुभ शेटये आणि इशान बोदले यांनी डॉक्टर कलाम यांचा जीवनपट उलगडून दाखवला. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या प्रीत्यर्थ मराठी काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यात पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यानी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परिक्षण बाबासाहेब लाड यांनी केले. पाचवी-सहावी गटात निषाद जोगळेकर, स्पृहा कांबळे आणि चिन्मयी पाटोळे यांनी तर सातवी-आठवी गटात यशस्विनी सुर्वे, गार्गी शिंदे, गौरी बने यांनी यश मिळवले. त्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देऊन गौरव करण्यात आला.
----------
---------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.