सोनवी पुलावर खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य

सोनवी पुलावर खड्ड्यांसह चिखलाचे साम्राज्य
Published on

२०२६९

सोनवी पुलावर खड्ड्यांसह चिखल
संगमेश्वर, ता. २२ ः मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर खड्डेच खड्डे पडले असून पूल धोकादायक झाला आहे.
संगमेश्वरजवळच्या आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रात पूल धोकादायक बनले आहेत. महामार्गावरील पुलांवर पडत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन अडकून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठेकेदार कंपनीसह बांधकाम विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप वाहनचालकांनी आणि पादचाऱ्यांनी केला आहे. याबाबत भाजपचे सरचिटणीस सतीश पटेल यांनी ठेकेदार कंपनीला सांगितल्यानंतर तात्पुरते खड्डे बुजविले होते. मात्र नंतर पुन्हा खड्डे पडले आहेत. तसेच पावसामुळे या पुलावर खड्ड्यांबरोबरच चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. पाऊस पडल्यानंतर तलावाचे स्वरूप प्राप्त होते. त्यामुळे वाहनचालकांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.
----------
--------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com