

-rat२१p२२.jpg-
P२४N२०३७६
सावर्डे : जिल्हास्तरावर विजय प्राप्त करणारा सावर्डे विद्यालयाचा संघ व मार्गदर्शक शिक्षक.
---------------
क्रिकेट स्पर्धेत सावर्डे विद्यालय विजयी
सकाळ वृत्तसेवा
सावर्डे, ता. २२ : रत्नागिरी येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात झालेल्या १९ वयोगटातील जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेमध्ये गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या संघाने अंतिम सामन्यात गुहागर संघाला पराभूत करून जिल्हा विजेतेपद मिळवले. हा संघ विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अंतिम सामन्यात सावर्डे संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली व चार षटकात ४१ धावा केल्या. त्यानंतर अवघ्या १६ धावांमध्ये गुहागर संघाला बाद केले. सावर्डे संघाचा कर्णधार कुणाल मस्कर यांनी उत्कृष्ट फलंदाजी व गोलंदाजी करून संघाला विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला. तन्मय कांबळे, प्रथमेश थोरात, विघ्नेश बने, श्रवण मिस्त्री, ओंकार कदम, यश डिके, आयुष भंडारी, आदित्य गुजर, सागर सुर्वे, आर्यन गुडेकर या खेळाडूंनी सांघिक खेळाचे प्रदर्शन केले.
--------
--------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.