

कणकवली हायस्कूलला
लोखंडी कपाट प्रदान
कणकवली ः नागवे गावचे सुपुत्र व मुंबईत राहणारे येथील विद्यामंदिर हायस्कूलचे माजी विद्यार्थी गोविंद शिरसाट यांनी विद्यामंदिर हायस्कूलच्या विज्ञान प्रयोगशाळेसाठी नुकतेच सुमारे ११ हजार रुपये किमतीचे लोखंडी कपाट देणगी म्हणून दिले. ही देणगी १९६८ मधील दहावी बॅचचे माजी विद्यार्थी असणारे गोविंद शिरसाट यांनी प्रशालेची गरज ओळखून दिली. यावेळी मुख्याध्यापक पी. जे. कांबळे, पर्यवेक्षिका वृषाली जाधव, विज्ञान विभागप्रमुख पृथ्वीराज बर्डे, जनार्दन शेळके, शर्मिला केळुसकर, सौ. तेली, प्रयोगशाळा सहाय्यक राजेंद्र तवटे, राजेंद्र तवटे आदी उपस्थित होते.
-------------
घावनळेत ६८ जणांची
मोफत नेत्र चिकित्सा
सावंतवाडी ः श्री रामेश्वर माऊली शेतकरी गट, शेतकरी मंडळ, घावनळे व नॅब नेत्र रुग्णालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने घावनळे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. दीपप्रज्वलनाने शिबिराचे उद्घाटन झाले. संस्था सचिव सोमनाथ जिगजिन्नी यांनी नॅब संस्थेची माहिती दिली. अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी नेत्र तपासणी शिबिराच्या आयोजनाची आवश्यकता स्पष्ट केली. शिबिराचा ६८ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. सवलतीच्या दरात चष्म्यांचे वाटप करण्यात आले. शिबिरासाठी रामेश्वर माऊली शेतकरी गट व नॅब नेत्र रुग्णालय, सावंतवाडी यांनी विशेष मेहनत घेतली.
---------------
डॉ. कलाम यांना
कणकवलीत वंदन
कणकवली ः वाचन संस्कृती टिकविणे काळाची गरज आहे. हेच ब्रीदवाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवण्यासाठीच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस अर्थातच ‘वाचन प्रेरणा दिन’ कणकवली नगर वाचनालय व आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स, वरवडे यांच्या विद्यमाने नुकताच झाला. ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष बुलंद पटेल, सल्लागार तानावडे, मुख्याध्यापिका अर्चना देसाई, नगर वाचनालयाचे ग्रंथपाल राजन ठाकूर, ग्रंथपाल सौ. आचार्य, वळंजू हेमंत पाटकर उपस्थित होते. डी. पी. तानावडे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शीतल बांदल यांनी केले.
-------------
करंजेत रंगला
‘आनंदी मेळावा’
कणकवली ः जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करंजे क्र. १ येथे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा विविध गुणदर्शन ‘आनंदी मेळावा’ झाला. विद्यार्थ्यांनी रंगमंचावर कला सादर केली. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेवर आधारित पथनाट्य सादर केले. नाटिका, गाणी, नृत्य, ईशस्तवन, स्वागतगीत आदी कार्यक्रमांनी मेळाव्याला रंगत आली. सरपंच सपना मेस्त्री, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय घोणे, उपाध्यक्ष श्रेया परब आदी उपस्थित होते.
---
मालवणात सोमवारी
गुरुद्वादशी उत्सव
मालवण ः मालवण-भरड येथील श्री दत्त मंदिरात सोमवारी (ता. २८) प्रतिवार्षिक गुरुद्वादशी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी दुपारी १२.३० वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे.
-------------
वेंगुर्ले येथे सोमवारी
आकाश कंदील स्पर्धा
वेंगुर्ले ः येथे शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. २८) खुली आकाश कंदील स्पर्धा आयोजित केली आहे. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी संदीप परब यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.