मानवी जीवनात संस्काराला खूप महत्व

मानवी जीवनात संस्काराला खूप महत्व
Published on

-rat२२p७.jpg
२४N२०५०७
मंडणगड : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनविद्या मिशनच्या कांचन पालव.
---------------
मानवी जीवनात संस्काराला महत्व

कांचन पालव ः मुंडे विद्यालयात संस्कार कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. २२ ः मानवी जीवनात संस्काराला खूप महत्व आहे. संस्काराशिवाय जीवन शून्य असून चांगले संस्कारच समाजाला श्रेष्ठ बनवतात. सर्वोत्तम जीवनाचा पाया उत्तम संस्कारांवरच अवलंबून असतो. आपल्यावर चांगले संस्कार नसतील तर आपले जीवन हे भरकटेल्या जहाजांप्रमाणे आहे, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनच्या प्रसारक कांचन पालव यांनी केले.
लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व क्रीडा विभागामार्फत जीवनविद्या मिशनअंतर्गत विद्यार्थी संस्कार कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, कार्यक्रमाधिकारी डॉ. शामराव वाघमारे, सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. विष्णू जायभाये, क्रीडाप्रमुख डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप, जीवनविद्या मिशनचे दत्ता केळस्कर, भरत पाटकर, सुधीर सोलकर, दीपा राणे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com