करिअर मेळावे विद्यार्थ्यांना लाभदायी

करिअर मेळावे विद्यार्थ्यांना लाभदायी
Published on

20566

करिअर मेळावे विद्यार्थ्यांना लाभदायी

निरंजन दीक्षित ः पडेल, जामसंडेत २५० जणांना मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २२ ः करिअरच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्याची सुरुवात दहावीमध्ये असतानाच होते. एखादा निष्णात करिअर समुपदेशक यामध्ये विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन करू शकतो. म्हणून कोणतेही शुल्क न घेता तालुक्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मेळावे आयोजित केल्याचे प्रतिपादन दीक्षित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष निरंजन दीक्षित यांनी केले.
येथील दीक्षित फाउंडेशन आणि कुशल अॅकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने तसेच शैक्षणिक विचार मंचच्या सहकार्याने जामसंडे व पडेल येथे करिअर मार्गदर्शन मेळावे घेण्यात आले. या मेळाव्यांना सुमारे २५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि पालकांनी सहभाग नोंदविला. दोन्ही मेळाव्यांना प्रतिसाद लाभला. जामसंडे येथील मेळाव्याचे उद्‍घाटन माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे यांच्या हस्ते, तर पडेल येथील उद्‍घाटन सामाजिक कार्यकर्ते केवल ठाकूर देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. कुशल अॅकॅडमीच्या वैशाली मणेरकर आणि जयंत मणेरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या दोन्ही कार्यक्रमांवेळी शैक्षणिक विचार मंचचे अध्यक्ष नारायण माने आणि समन्वयक हिराचंद तानवडे उपस्थित होते. जामसंडे येथील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीशकुमार कर्ले यांनी, तर पडेल येथील सूत्रसंचालन विकास दीक्षित यांनी केले.
---
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
वैशाली मणेरकर यांनी, दहावीनंतर पुढे काय या अनुषंगाने नियोजन कसे करावे, याबद्दल माहिती दिली. विविध क्षेत्रांतील करिअरचे पर्याय नमूद केले. जयंत मणेरकर यांनी, आपल्या भागातील विद्यार्थी करिअरची निवड करताना अगदी मोजकाच विचार करतात. आपली क्षमता, आवड, कल, पालकांच्या अपेक्षा व कौटुंबिक परिस्थिती या सगळ्यांचा योग्य प्रकारे मेळ घालून शाखा निवडावी लागते, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com