

-rat२२p२.jpg-
P२४N२०५०२
रत्नागिरी ः राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या निधीचा सत्कार करताना शेखर शेट्ये.
--------
निधी भिडेची राज्यस्तरी स्पर्धेसाठी निवड
साताऱ्यातील विभागीय जलतरणमध्ये चमकदार कामगिरी
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २२ ः सातारा येथे झालेल्या शालेय विभागस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरीच्या निधी भिडेने दोन सुवर्णपदकांसह एक रौप्यपदक पटकावले. तिची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
५० व २०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये तिने सुवर्णपदक आणि १०० मी. ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवले. स्पर्धेमध्ये येथील फाटक हायस्कूलचे चार विद्यार्थी सहभागी झाले होते. १९ वर्षाखालील मुलांच्या गटांमध्ये बारावीचा यश कीरने २०० मीटर फ्री स्टाईलमध्ये कास्यपदक पटकावले. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या निधीचा आणि यश कीर याचा दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे कौन्सिलर शेखर शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी फाटक हायस्कूलचे मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, संस्थेचे सचिव दिलीप भातडे, क्रीडाप्रमुख सावंत व क्रीडाशिक्षिका पाटील आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.