

20578
टाळसुरे गावात फटाकेबंदीचा निर्णय
प्रदूषणमुक्त दिवाळी; वाडी-वस्तींवर जनजागृती
सकाळ वृत्तसेवा
दापोली, ता. २२ः तालुक्यातील टाळसुरे गावाने दिवाळीमध्ये कोणीही फटाके वाजवायचे नाहीत असा निर्णय घेतला आहे. प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी हा निर्णय गावाने घेतला आहे.
दीपोत्सव म्हणजे दिव्यांचा सण. दिवाळीत नवे कपडे, फराळची रेलचेल असते. जोडीला असते ती फटाक्यांची आतषबाजी. फटाक्यांमुळे क्षणिक आनंद मिळतो. मात्र त्यातून ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण होते. ते रोखण्यासाठी टाळसुरे गावाने फटाकेबंदीचा एकमुखी निर्णय घेतला. वाढते प्रदूषण, तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर गावाने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
टाळसुरे ग्रामपंचायतीने ‘माझी वसुंधरा ०.५’ मोहीम यशस्वी करण्याचा संकल्प केला आहे. या मोहिमेंतर्गत जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत फटाकेबंदीचा निर्णय घेण्यात आला असून गावातील प्रत्येक वाडी-वस्तीवर जाऊन फटाकेबंदीबाबत जनजागृती करण्यात येत आहे. गावात फटाके फोडण्यास आणि विक्री करण्यासही बंदी आहे. याबाबतच्या जनजागृती फेऱ्यांमध्ये विद्यार्थी, महिला सहभागी होत आहेत. या मोहिमेला ग्रामस्थांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती टाळसुरे ग्रामपंचायत अधिकारी दिनेश मर्चंडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.